Shirdi : स्वच्छतागृहात आढळला तरुणाचा मृतदेह

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

घातपाताचा पोलिसांचा संशय

शिर्डीत एका अज्ञात तरुणाचा विवस्त्र अवस्थेत नगरपंचायतच्या स्वच्छतागृहात मृतदेह आढळला आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेमुळे शिर्डीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इसमाचा घातपात करून खून करण्यात आला आहे का याचा तपास पोलीस करीत आहे.

कोरोना बाधित रुग्ण आढळला असल्यामुळे शिर्डीत बहुतांश ठिकाणं ही निर्मनुष्य झालेली आहेत. अशा परिस्थितीत शिर्डीतील बसस्थानकासमोरील साईबाबा सुपर स्पेशालिटी रूग्णालयाजवळ असणाऱ्या नगर पंचायतच्या स्वच्छता गृहात शनिवारी दु. १२ वाजेच्या सुमारास एका तरुणाचा (वय ३५ वर्षे अंदाजे) विवस्त्र मृतदेह आढळला आहे. मृताच्या शरीरावर जखमा दिसून आल्या आहेत. त्यामुळे त्या इसमाचा खून झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

मृत व्यक्ती हा भिक्षेकरी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शिर्डीतील काही भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. त्या मृतदेहाचा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह राहाता येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृताची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, यांनी भेट दिली असून या प्रकरणाचा तपास करून यातील आरोपी लवकरच शोध घेऊन अटक करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here