Shevgaon : भाजपचा कार्यकर्ता तळागाळातील नागरिकांशी जोडलेला – आमदार राजळे

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शेवगाव – केंद्रातील भाजपा सरकारचा विकासाचा संदेश घराघरात पोहोचण्यासाठी बुथ कमिटीच्या सदस्यासह सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, यासाठी आजची बैठक आयोजित केले असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या सलग दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपुर्तीनिमित्त शेवगाव तालुका भाजप कार्यकर्त्यांची बैठक आज आमदार कार्यालय येथे पार पडली. यावेळी तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, माजी तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, शहर अध्यक्ष रवी सुरवसे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, विनोद मोहिते, नगरसेवक महेश फलके, सरचिटणीस भीमराज सागडे, उमेश भालशिंग, सोसिअल मीडियाचे गणेश जायभाये, गंगा खेडकर, राम केसभट, नितीन फुंदे, दिगंबर काथवटे, बाबासाहेब गोर्डे, सोनावणे सर, प्रा मालाणी, देवढे अप्पा, किरण काथवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, देशात 2014 नंतर पुन्हा 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला देशातील नागरिकांनी पुन्हा एकदा निवडून देऊन इतिहासात एक सोनेरी अध्याय जोडला. केंद्राने कोरोना आजाराच्या काळात नियोजन पूर्ण व पूर्ण क्षमतेने कार्य केले या कालावधीमध्ये सामान्य नागरिकापर्यंत थेट कशी मदत पोहोच होईल याकडे भर दिला गेला.
शेतकरी शेतमजूर असंघटित कामगार यांच्याकरिता शासनाने वेगवेगळ्या योजना राबवल्या या योजना तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशातील नागरिकांची या पत्राद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रातील भाजपा सरकारचा विकासाचा संदेश घराघरात पोहोचण्यासाठी बुथ कमिटीच्या सदस्यासह सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे या राजळे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार ७० वर्षातील ३७० कलम, राममंदिर असे  प्रलंबित प्रश्न सोडविण्यात यशस्वी होत आहे. जनधन खात्यात पैसे टाकुन तसेच मोफत गॅस देऊन कोरोना काळात गरीबांना मदत केली. तसेच उद्योगधंद्यासाठी २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज दिले असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील त्यामुळे आत्मनिर्भर भारत होण्यास मदत होणार आहे.
याउलट राज्य शासन सर्व पातळीवर अपयशी करत आहे. कोरोनाकाळात जनतेला एक ही रुपयाचे पॅकेज देऊ शकले नाही. राज्य सरकारमध्ये आत्मविश्वास सुद्धा राहिला नाही. बांधावर खते देऊ म्हणणारे शेतकऱ्यांना दुकानातून सुद्धा आवश्यक तेवढे खते देऊ शकत नाहीत. पावसाळा सुरू झाला तरी कापूस खरेदी सुरू नाही. तसेच सोशल मीडियावर शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाचे पेड कार्यकर्ते एकत्रितपणे भाजपा नेत्यावर टिका करतात त्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी जशास तसे चोख प्रत्युत्तर द्यावे.
यावेळी निरीक्षक युवराज पोटे, माजी नगर तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी श्रीगोंदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here