Shevgaon : आमदार राजळे यांच्याकडून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोना चिकित्सा व संरक्षण उपकरणांचे वितरण

4

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – आमदार मोनिका राजळे यांनी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी थर्मल स्कॅनर, पल्स अक्सिमीटर, पीपीई किट, एन ९५ मास्क, फेस शिल्ड, सिनेटायझर या वैद्यकीय उपकरणाचे वितरण केले. शेवगाव तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३ प्राथमिक उपकेंद्र, शेवगाव व बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे या साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद  लोढे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, नगरसेवक महेश फलके, तालुका ग्रामीण रुग्णालय चे डॉ. रामेश्वर काटे, मेडिकल असोसिएशन ऑफ शेवगाव तालुका अध्यक्ष डॉ. विकास बेडके, सचिव डॉ. मयूर लांडे, डॉ. विजय फलके डॉ. दिनेश राठी, डॉ.अमर ढमाळ, डॉ. मुकुंद दारकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजळे म्हणाल्या, मुंबई-पुणे-औरंगाबाद या सारख्या शहरानंतर आता ग्रामीण महाराष्ट्रात कोरोना या साथीच्या आजाराचा प्रसार होत आहे. यावेळी बाहेरून आलेल्या नागरिकांची तपासणी होणे आवश्यक असते. परंतु थर्मल स्कॅनर, पल्स अक्सिमीटर, हे प्राथमिक चाचणीसाठी आवश्यक असणारे उपकरणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची व नागरिकांची अडचण होत असल्याने थर्मल स्कॅनर, पल्स अक्सिमीटर या चाचणी उपकारांची तसेच रुग्ण हाताळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना पीपीई किट, फेस शिल्ड, सिनेटायझर, एन ९५ मास्क या साहित्याचे वितरण करण्यात करण्यात आले. याच प्रमाणे तालुक्यातील कोवीड केअर क्लिनिक वर सेवावृत विनामूल्य काम करणाऱ्या १२० खाजगी डॉक्टरांना पीपीइ किट तसेच N९५ माक्स यावेळी देण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सलमा हिरानी यांनी आमदार मोनिका राजळे यांचे आभार मानले.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here