Newasa : अखेर नेवासा फाटा पोलीस दूरक्षेञ चौकीला मुहूर्त मिळाला…. काम सुरु ! व्यापाऱ्यांत समाधान!

3
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

नेवासा फाटा येथे अनेक वर्षांपासूनची व्यापा-यांची पोलीस चौकीची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. पोलीस चौकीच्या बांधकामाला सुरुवात होऊन व्यापारी वर्गाने याबाबत समाधान व्यक्त केले आहे. 

नेवासा फाटा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस चौकी होण्याची मागणी व्यापारी वर्गाने केलेली होती. ही चौकी नेमकी भानसहिवरा येथे करायची की, नेवासा फाटा येथे हा पोलिस प्रशासनापुढे पेच निर्माण झालेला होता. माञ येथील व्यापाऱ्यांची बैठक येथील पोलिस पाटील आदेश साठे व सरपंच सतिश निपुंगे यांच्या पुढाकारातून घेण्यात आली.
या बैठकीला नेवासा पोलीस ठाण्याचे पो.नि.रणजित डेरे उपस्थित होते. यावेळी चौकीला जागा व बांधायची कशी ? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले. चौकीला जागाही लगेच येथील ‘राजमुद्रा’ चौकात उपलब्ध करण्यात आली. चौकी बांधण्यासाठी व्यापाऱ्यांनी वर्गनी करण्याचे ठरविले अन् नेवासा फाटा येथील पोलिस चौकीचा प्रलंबित प्रश्न चुटकी सरशी सुटून प्रत्यक्षात चौकी बांधण्याचे कामही सुरु झाल्याने व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
नेवासा फाटा येथे पोलिस चौकी उभारण्यात यावी ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांनी केलेली असताना ही पोलिस चौकी नेमकी भानसहिवरा की नेवासा फाटा असा पेचप्रसंग पोलिस प्रशासनापुढे निर्माण झालेला होता. माञ, नेवासा फाटा येथे चौकीला जागा उपलब्ध करुन देऊन चौकी बांधण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने प्रत्यक्षात चौकीचे काम सुरु झाले आसून नेवासा फाटा व परिसरातील ‘भाईगिरीला’ आळा बसून व्यापाऱ्यांना आधार मिळणार असल्याने नेवासा फाटा येथील ग्रामस्थांकडून पोलिस निरिक्षक रणजित डेरे यांच्या निर्णयाचे मोठे कौतूक होताना दिसून येत आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here