!!भास्करायण:२२!! शेतक-यांनो, जनुकीय सुधारीत बियाणे पेरते व्हा!

1
भास्कर खंडागळे ,बेलापूर

(९८९०८४५५५१ )

शेतकरी संघटना आज १२ जूनपासून आगळंवेगळं सविनय कायदेभंग आंदोलन हाती घेत आहेत. ज्या जनुकिय सुधारीत बियाणांवर शासनाने बंदी घातली आहे, त्या बियाणांची पेरणी करुन कायदेभंग करायचा!असं या आंदोलनाचं स्वरुप आहे.

या आंदोलनाला सर्वच शेतक-यांच्या पाठबळाची आवश्यकता आहे.याचे कारण हे काही राजकीय आंदोलन नाही किंवा राजकिय हेतूसाठीही नाही. खरे स्व.शरद जोशी असल्यापासून शेतीत आत्याधुनिक तंञज्ञान आणावे,अशी मागणी केली जात,आहे.पण चाळीस वर्षे होवूनही शासन ढिम्म आहे.
स्व.शरद जोशी हे खुली अर्थव्यवस्था,गॕट करार याबाबत आग्रही होते. तसेच जागतिक स्पर्धेत भारतीय शेतक-यांना टिकवायचे असेल, तर त्यांना आधुनिक बियाणे, प्रगत तंञज्ञान दिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.गॕट करारासंदर्भात त्यांची मते स्पष्ट होती.ते स्वतः आर्थिक अभ्यासक असल्याने त्याला साजेशी आशीच ते गॕट कराराची मांडणी व उकल करीत असत.पण केवळ सत्तेसाठी राजकारण असते असे मानणाऱ्या राज्यकर्त्यांना शरद जोशी समजले नाहीत वा जाणूनबुजून त्यांचे विचार अव्हेरण्यात आले.
भारतीय शेतकरी व शेतीची दूरवस्था होण्यास शासनाची दळभद्दी धोरणेच कारणीभूत आहेत,असे मला स्व.शरद जोशी यांनी शेतकरी संघटक या संघटनेच्या मुखपञातील मुलाखत घेताना स्पष्ट केले होते.त्यावेळी मी शेतकरी संघटकच्या ञिसदस्यिय संपादकीय मंडळाचा सदस्य होतो. शेतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करुन देणं,हे सरकारचे कर्तव्य आहे.तसे न करता तोकडी अनुदाने देणे,तात्पुरती मलमापट्टी करुन वेळ मारुन नेणे,हेच  शासकिय धोरण राहिले आहे,असे स्व.जोशी सांगत.
नवव्वदिच्या दशकात  देशाने जागतिकीकरण व खुली अर्थव्यवस्था स्विकारली.त्यालाही सुमारे तिस वर्षे लोटली.या तिस वर्षात खुल्या अर्थव्यवस्थेची कोणती फळे शेतक-यांना चाखायला मिळाली,याचा लेखाजोखा सरकारने मांडला पाहिजे.याचे कारण याच कालावधीत शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या.हजारो शेतक-यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीव सोडला.शेतक-यांच्या आत्महत्येचंं खरं तर आॕडिटच झाले पाहिजे.देशाचे राज्यकर्ते  जागतकीकरण,औद्योगिकीकरण व नागरीकरणात मश्गुल राहिले.यात शेतकरी नामक कोणी आहे,याचाच विसर राज्यकर्नात्यां पडला.हा विसरच शेतक-यांच्या आज मुळावर आला आहे.
शेतमालाला शाश्वत हमीभाव देण्याचा साधा प्रश्न राज्यकत्यांना सोडविता आलेला नाही.गेली सत्तर वर्षे फक्त आश्वासनांची पाने शेतक-यांच्या तोंडाला पुसण्यात आली.शेतक-यांच्या जिवावर सम्राट ,महर्षी अशी बिरुदावली मिरविणारेच शेतक-यांचे काळ ठरले आहेत.शेती क्षेञाला रस्ते,वीज,पाणी,साठवणूक अशा पायाभूत सुविधा राजकीय धेंडांना देता आल्या नाहित,याला काय म्हणावे.काँग्रेसने सहकारसम्राट निर्माण करुन गुलामगिरी पोसली.निवडणूकीपुरता शेतक-यांना राजा बनवून पुढे त्याला गुलामगिरी व दारिद्यात ढकलण्याचे काम केले.
पुढे भाजपचा राजकीय पटलावर उदय झाला.शेतक-यांना रास्तभाव मिळण्यासाठी स्वामिनाथन आयोग लागू करु अशा गर्जना दिल्या.या आश्वासनावर भाजपने दोन निवडणूका जिंकल्या.आता ते देखिल काँग्रेसच्याच वाटेने जात आहेत.केन्द्र शासनाने नुकताच बाजार समित्या रद्द करण्याचा व शेतक-यांना थेट शेतमाल विकण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला.निर्यण घेताना कोणतेही नियोजन,नवी पर्यायी व्यवस्था उभी न करता अचानक निर्णय घेवून धक्का द्यायचा,सनसनाटी निर्माण करायची, याला सरकार म्हणायचे कां?
असो. प्रश्न आहे तो शेतक-यांना आधुनिक तंञज्ञान पुरविण्याचा. आधुनिक तंञज्ञान वापरणे हा शेतक-यांच्या घटनादत्त अधिकार आहे.माजी मुख्यमंञी फडणवीस हे शेतीबाबात राणादेवी थाटात बोलत असतात.शेतीचे उत्पन्न दिडपट करु ही त्यांची आवडती घोषणा.आरे पण इथे आहे तेच खपत नाही,त्याला कवडीमोल भाव मिळतो.वर दिडपट उत्पादनाची विल्हेवाट कशी लावणार,उकिरड्यावर की रस्त्यावर,हे कोण सांगणार?
जग आता तंञज्ञानाचं आहे. अशा काळात शासनाने जनुकीय सुधारित बियाणे वापरण्यास प्रतिबंध करणे घटनाबाह्य व शेतक-यांच्या हक्काचे संकूचन करणारे आहे.जनुकीय सुधारित बियाणे हे रोग,किड व तण प्रतिबंधक असते.असे बियाणे वापरले तर उत्पादन खर्च घटेल. उत्पादनाची गुणवत्ता व दर्जा वाढेल.शेतक-यांना थोडाफार पैसा मिळून त्याची आर्थिकस्थिती सुधारेल. पण राज्यकर्ते शेतक-यांना कोलदांडा कां घालतंय,हेच कळत नाही.आमचं सरकार शेतक-यांचं आहे,ते यालाच म्हणायचं कां?
आता शेतक-यांची शिकलेली युवा पिढी शेतीत आली आहे.तिला तंञज्ञानाचं महत्व कळतंय.तो आता जमाखर्चही करतोय.सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला राजकीय गुलामगिरी नकोय तर आत्मनिर्भरता हवीय.शासन सदर बियाणे वापरास प्रतिबंध करते, या मागे अर्थकारण आहे. किड,रोग व तणनाशक कंपन्या कोट्यावधींचा मलिदा राजकीय धेंडांना देतात,हे ध्यानात घ्या.हा मलिदाच निवडणूकीत वापरला जातो. तेव्हा शासनाने शेतक-यांची खदखद वेळीच ओळखून त्याला जनुकीय सुधारित बियाणे व तदनुशंगिक तंञज्ञान  वापरण्याची मुभा द्यावी. न दिल्यास शेतक-यांनो, हक्काची लढाई लढा. राजकाण्यांचं तण उपटून तंञज्ञान वापरुन,जनुकीय बियाणे पेरते व्हा!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here