Shrigonda :अजनूज येथील भिमा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अजनूज – वडगाव दरेकर येथे भिमा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शेजारील तालुक्यात कोरोना रुग्ण सापडत असल्याने या कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा पूल पोलिस बंदोबस्तात बंद करण्यात आला. हा पूल अहमदनगर आणि पुणे जिल्हा यांना जोडणारा पूल आहे. 
याच पुलावरुन सिद्धटेक, इंदापूर, भिगवण, राशीन, करमाळा, बारामती या गावांसाठी वाहतूक होत असते. अगदी जवळचा मार्ग आहे. पुला शेजारी अजनूज गाव असल्याने कदाचित आपल्या गावाला सुद्धा भिती वाटत आहे.
हा पूल बंद केल्यानंतर काही जणांनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोनाच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे हा पुल बंद होणे गरजेचे होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here