Kopargaon : विनापरवाना प्रवास करून आलेल्या दहा जणांविरोधात गुन्हा

प्रातिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कोपरगाव – कोरोना साथ सुरु असतानाही स्थलांतर करून या साथीचा प्रसार होऊ शकतो, असे माहिती असतानाही विविध ठिकाणाहून ई-पास न घेता प्रवास करून कोपरगावात आलेल्या दहा स्त्री-पुरुषाविरुद्ध शहर पोलिसांनी विविध तीन गुन्हे दाखल केले आहे.

कोरोनाने कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे. कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता. मध्यन्तरी एक महिला डॉक्टरचा अपवाद ठरवता संशयित रुग्णाची भर पडल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर आरोग्य विभागाने हा रुग्ण परिसर पूर्ण बंद केला असताना आता मुंबई पुणे, मनमाड,वैजापूर,येवला आदी ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आता या शहरातील नागरिक आता ग्रामीण भागात धाव घेऊ लागले आहे. त्यातूनच आता रात्री-अपरात्री विना परवाना येऊन राहत असल्याचे तालुका व पोलीस प्रशासनाच्या लक्षात आले आहे.

त्यातूनच काल कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी सचिन भगवान उबाळे,भगवान गउजी उबाळे,कल्पना भगवान उबाळे,राखी सचिन उबाळे सर्व रा.बेंद्रे चाळ सहकार नगर मनमाड,ता.नांदगाव, मनोज बद्रीनारायण काबरा, सुजाता मनोज काबरा दोघे रा.मेनरोड येवला, प्रसाद जनार्दन सोनवणे, ऐश्वर्या प्रसाद सोनवणे, दोघे रा.नागडे,ता.येवला, वसंत नाना काळे, आकाश वसंत काळे दोघे रा.यशवंत कॉलनी वैजापूर आदी दहा जणांवर सुमारे तीन गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे,आर.पी.पुंड,आदी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here