बॉलीवूडला धक्का: अभिनेता सुशात सिंह राजपूतची आत्महत्या; गळफास घेण्यापूर्वी काय असेल मनात?

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

अभिनेता सुशात सिंह राजपूतने बांद्रा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण बॉलीवूड जगताला मोठा धक्का बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता अशी माहिती पुढे येत आहे.

दरम्यान, सुशांतचा मृतदेह पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. अनुपम खेर पासून अक्षयकुमार पर्यंत प्रत्येकाने या सुशांतच्या या कृतीवर दुःख आणि आश्चर्य व्यक्त केले आहे.

सुशांतचा 21 जानेवारी 1986 रोजी जन्म झाला. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी सुशांत सिंह राजपूत याने एवढं टोकाचं पाऊल का उचललं, असं काय घडलं जेणे सुशांतने आत्महत्येचं निर्णय घेतला. त्याच्या या कृतीमुळे समस्त बॉलीवूडला धक्का बसला आहे.

स्टार प्लसवरील किस देश मै हे मेरा दिल ही त्याची पहिली मालिका होती. पवित्र रिश्ता ही छोट्या पडद्यावरील मालिका गाजवल्यानंतर त्याने काय पो चे या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने पीके, डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी, शुद्ध देसी रोमान्स, रबता, छिछोरे, अशा अनेक चांगल्या चित्रपटात काम केले. मात्र, क्रिकेटपटू एम. एस. धोनी हा त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड होता. इतका ख-या खु-या धोनीची विसर पडावा इतका तो या भूमिकेला समरस झाला होता. केदारनाथ हा त्याचा अगदी अलीकडचा 2018 मधील गाजलेला चित्रपट होता.

नेमकं काय घडलं असेल शेवटच्या क्षणी

सुत्रांच्या माहितीनुसार, सुशांतसिंग राजपूत हा गेल्या 6 महिन्यापासून डिप्रेशनमध्ये होता, असे समजते. मात्र, डिप्रेशनचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. सुशांतने आत्महत्या केली, त्यादरम्यान त्याचे काही मित्र त्याच्या घरी होते. मात्र अचानक तो एका रुममध्ये निघून गेला. त्याला त्याच्या मित्रांनी आवाज दिला. मात्र त्याने रुममधून काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला आणि त्यावेळी तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. यानंतर त्याच्या मित्रांनी पोलिसांना फोन करत याबाबतची माहिती दिली.

सध्या तरी पोलीस त्याच्या मित्रांशी विचारणा करीत आहेत. त्यामुळे नेमकं काय घडलं असेल याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागले आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here