Shrigonda : खिडकीचे ग्रील काढून घरात प्रवेश करून 1लाख 62 हजाराचा मुद्देमाल लंपास

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील लोणीव्यंकनाथ शिवारातील भनाळीतील सुहास विष्णु कोल्हे यांच्या घराची खिडकीची ग्रील काढून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ६२ हजार किमंतीचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे.
समजलेली अधिक माहिती कोल्हे परिवारातील सदस्य घरात झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी घराची पश्चिमेकडील खिडकीची ग्रील काढली. घरात प्रवेश केला. कपाटातील दीड लाख किमंतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने आणि १२ हजाराची रोकड लंपास केली.
घटनास्थळास रविवारी सकाळी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस हवालदार व्ही एम बढे यांनी भेट दिली . श्वान पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला. सुहास कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील सह्यायक पोलिस निरीक्षक सतिश गावीत करीत आहेत.
चोरटे स्थानिक 
सुहास कोल्हे यांच्या घराची कोणत्या खिडकीची ग्रील खराब आहे. यांची पाहणी करुन स्थानिक चोरट्यांनी ही चोरी केली. असावी असा संशय पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here