Shrirampur : प्रवरा नदीपात्र परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच; शेळी फस्त-कालवडीवर हल्ला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

उक्कलगाव – प्रवरा नदीपात्र परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून बिबट्याने काल रात्री एक शेळी फस्त केली. तसेच एका कालवडावर हल्ला चढवून जखमी केले आहे. 
बिबटयाचा धुमाकूळ परिसरात सुरुच असून काल रात्रीत परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्याच दरम्यान रात्रीत पावसाने काही वेळाने विश्रांती दिल्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावमधील वाकण वस्तीवर बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला.
येथीलच परिसरातील गोरक्षनाथ थोरात यांच्या नदीपात्र नजीक असणार्‍या वस्तीवर त्यांच्या गाईच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर झडप घालून शेळी फस्त केली. तसेच गोठ्यातील पाच महिन्याच्या कालवडीवर हल्ला करत जखमी केले. बिबट्याने कालवडीच्या मानेला धरल्याने कालवडीच्या मानेला जखमा झाल्या असून कालवडीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर पशुवैद्यकीय डाॅक्टरांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले असून या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here