Agriculture : कोरोना शेतकऱ्यांच्या मुळावर

0

प्रतिनिधी| बाळासाहेब नवगिरे| पानेगाव | राष्ट्र सह्याद्री

शेतातील नापिकी, हमीभाव नाही, नैसर्गिक आपत्तीची भरपाई नाही, कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा, खासगी सावकारांसह बॅंकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा आणि कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे झालेली कोंडी या प्रमुख कारणांमुळे जणू शेतकऱ्यांच्या मुळावरच कोरोना उठला आसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जवळपास तीन महिन्यापासून शेतकरी हताश झाला असून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला भावच नाही तर काहिंनी शेतात फळे, भाजीपाला सोडून दिल्याची वेळ आली. कांदा चाळीत सडतोय, शेतकरी रडतोय अशी अवस्था कांद्याला भाव नसल्याने झाली.

जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे गळीताला गेलेले ऊसाचे पाच महिन्यापासून बील खोळंबली असा वेळेस तोंडावर आलेला खरीप हंगाम सर्व विसरून कसं सामोर जायचे म्हणून घरातील दागदागिने बँकेत गहाण ठेवून कित्येक शेतकऱ्यांनी कर्ज उपलब्ध केले. त्यातच वाढलेले शेतमजुरी, ट्रॅक्टर मशागती बी -बीयाणे, औषधाच्या किंमती शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी खरीपासाठी ना सोयाबीन ना कुठलेच बियाणे सवलतीच्या दरात न अनुदानावर दिले. त्यातच जोडधंदा म्हणून ओळखला जाणारा दूध धंदा जणू आखेरच्या घटका मोजत आहे. यातून ही मार्ग काढत बळीराजा लढतोच पण हे कुठपर्यंत चालणार नोकरशाहीचे वाढलेले भयंकर पगार आणि बळीराजाची काय परिस्थिती आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा आत्महत्या वाढल्या तर आश्चर्य मानायचे नाही. मार्च ते मे २०२० या कालावधीत राज्यातील तब्बल १,१९८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मदत व पुनर्वसन विभागाने याची माहिती दिली.

देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास राज्य व केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मार्च ते मे २०१९ च्या (६६६ आत्महत्या) तुलनेत लॉकडाउन काळात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडून सांगण्यात आले.

२००१ पासून मे २०२० पर्यंत राज्यात तब्बल ३४ हजार २०० शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आपली जीवनयात्रा संपविली आहे. लॉकडाउन काळात आत्महत्या केलेल्या बाराशे शेतकऱ्यांपैकी साडेचारशे शेतकऱ्यांनाच सरकारी मदत मिळाली असून उर्वरित प्रस्तावांची छाननी अद्यापही सुरू आहे.

कोरोनामुळे निश्चितच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातच वाढलेल्या औषधे,बी- बियाणे शेती मजूरी त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत करावी. 
– दत्तात्रय घोलप- अध्यक्ष -मुळाथडी पाणी आरक्षण समिती.

शेती मालाला मिळत नसलेला भाव त्यातच मशागती फवारणी साठी लागणारे औषधे, शेती मजुरांचे वाढलेले भाव याचा मेळ बसत नसल्याने शेती करायची कशी म्हणून शेतकरी सध्या हताश झाल्याचे चित्र दिसत आहे.
– चंद्रकांत टेमक, संचालक कै.मच्छिंद्र पाटील सेवा संस्था करजगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here