Shirdi : किरकोळ पैशांच्या मागणीवरून ‘त्याचा’ दगडाने ठेचून खून

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिर्डी – नगरपंचायतीच्या स्वच्छता गृहात आढळलेला मयताचा नैसर्गिक मृत्यू नसून त्याचा दगडाने ठेचून किरकोळ पैशाच्या मागणीकारणावरून तिघांनी त्याचा खून केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलतांना दिली.

राजेंद्र गोविंद गवळी, वय 30 रा.साठेनगर, ता.घनसांंगवी,जि.सांगली), सुनील शिवाजी जाधव, (वय 30 , रा. यशवंत नगर, सोनारवाडा, ता.बार्शी, जि.सोलापूर), सुनील महादेव कांबळे (वय 21, रा. शिंगणापूर,ता.जत, जि.सांगली), अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

शहरात शनिवारी साईबाबा सुपर हॉस्पिटल शेजारील नगर पंचायतीच्या स्वच्छतागृहात विवस्त्र, असा एक मृतदेह आढळून आला होता. या प्रकाराचा उलगडा पोलिसांनी तासातच केला आहे. नैसर्गिक मृत्यू नसून तो किरकोळ पैशाच्या मागणीवरून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे संशयित तिघांना ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान मयत इसमाच्या डोक्यात दगडाने ठेचून खून केल्याचे कबुली तिघांनी दिली.

दरम्यान, तिघे आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान पोलीस पथके रवाना करून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गवळी, जाधव, कांबळे यांंना संशयित म्हणून पकडण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या तिघांनी पैशाची मागणी मयत इसम शंकर उर्फ अण्णा यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. या वादातून तिघा आरोपींनी मयत शंकर उर्फ आण्णा याच्या डोक्यात दगड तसेच लोखंडी रॉडवर टाकून त्यास मारल्याची कबुली दिली आहे.

अहमदनगर पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक सुभाष भोये, पो.स.ई.आण्णासाहेब परदेशी, स्था.गुन्हे शाखेचे पो.स.ई.गणेश इंगळे, शिर्डी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, सहा पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या प्रयत्नाने या खूनाचा छडा लावण्यात आला. पो.ना. मारुती लहानू गंभीरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here