Kopargaon : डॉक्टर महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कोपरगाव – शहरातील एक उच्च शिक्षित डॉक्टर महिलेचा एका अज्ञात इसमाने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून व्हाट्सअपच्या सहाय्याने अश्लील चलचित्र, छायाचित्र, संदेश, दृकश्राव्य संवाद साधून या महिलेशी जवळीक साधण्याचा व फिर्यादी महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिलेला एका अज्ञात व्यक्तीने मो.क्रं.९११९४४३७७७,८८०६३०२९२१,९०७५३५६८५२ या भ्रमणध्वनी क्रमांकावरून दि.९ जून ते १२ जून या कालावधीत रात्री सात ते अकरा वाजेच्या दरम्यान संपर्क साधून फिर्यादी माहिलेच्या भ्रमणध्वनीवरील व्हॉट्सअपवर अश्लील चलचित्रफीत, फोटो, संदेश, चलचित्रसंवाद साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न करून फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला आहे.या प्रकरणी या महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध फिर्यादी दाखल केली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.न.२१०/२०२० भा.द.वि.कलम ३५४(ड),५०९,सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here