Rahuri : देवळाली प्रवरात जुगार अड्ड्यावर नगर पोलिसांचा छापा

3

प्रतिनिधी | राजेंद्र उंडे | राष्ट्र सह्याद्री

देवळाली प्रवरा येथील मोठ्या जुगार अड्ड्यावर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा जुगार खेळताना 30 जणांना रंगेहाथ पकडून गजाआड केले. यावेळी डावावर लावलेली 50 हजार रुपये व 1 लाख 2 हजार रुपयांची वाहने ताब्यात घेतली आहे. जुगार खेळताना वकील, डॉक्टर, प्रतिष्ठित यांना गजाआड करण्यात आले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी देवळाली प्रवरा गावातील खंडोबा मंदिरा जवळील टिक्कल वस्ती येथे नगर, नेवासा, घोडेगाव, राहुरी कारखाना, देवळाली प्रवरा, आदी भागातील 30 जुगारी शेडमध्ये जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. जुगार अड्यावर छापा मारला. परंतू पोलिसांनी फिर्याद दाखल करताना अवघी 50 हजाराची रक्कम दाखविली आहे. जुगार तिरट मन्ना नावाचा खेळ खेळला जात होता.

या खेळात पहिला हात 10 हजाराचा तर त्या पुढिल डाव 20 च्या पुढे चालवला जात होता. एक डाव साधारण 10 ते 15 लाखाचा डाव चालू होता. 30 जणांच्या अंगझडतीत 10 लाखाच्या आसपास रक्कम सापडली अशी एकूण 25 लाख रुपयांची रक्कम हस्तगत केलेली असताना फिर्यादीत अवघी 50 हजाराची रक्कम दाखवली गेली आहे. जुगार अड्यावर पकडण्यात आलेले जुगारी पुढील प्रमाणे प्रदीप सुनिल ठोंबरे (वय23),सचिन गोरख कुऱ्हाड (वय28), प्रशांत चंद्रकांत अल्हाट(वय23), शाहरूख जावेद शेख (वय24), आकाश मच्छिंद्र टेमकर (वय28), दत्ताञय रामदास गवळी (वय38)सर्व रा. घोडेगाव ता.नेवासा चंद्रकांत राजाराम चक्रनारायण (वय30) रा.कौठा, ता.नेवासा, बापू सूर्यभान तोडमल (वय43)रा.बायजाबाई जेऊर, ता.जि.अहमदनगर,

मनोहर बहूबल खूबचंदने (वय60) रा.सिंधीकाँलनी, तारकपूर ता.अहमदनगर , राजमहंमद नजीर आत्तार (वय49) रा.भिंगार धनगरगल्ली, ता.अहमदनगर , संतोष नामदेव देवकर (वय45) रा.शेरकर गल्ली तेलीखुंट ता.अहमदनगर, अर्जुन विठ्ठल परदेशी (वय58) रा.घासगल्ली,भिंगार ता.अहमदनगर , किरण प्रभाकर पानपाटील (वय48) रा.सदरबाजार ,भिंगार, ता.अहमदनगर मधुकर नाथा मोहीते  (वय40) रा.सातभाईगल्ली ता.अहमदनगर ,अण्णासाहेब निवृत्ती कराड  (वय30) रा.चेतना हाँटेल, औरंगाबाद रोड ,ता.अहमदनगर ,पप्पू उर्फ बाळकृष्ण रामचंद्र टिक्कल (वय31), सचिन दिलीप घोरपडे  (वय30), अजय रामराव जाधव (वय35), करीम अहमद शेख (वय32), अँड प्रशांत दत्ताञय मुसमाडे (वय34), अनिस अहमद शेख(वय38) सर्व रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी हरी मधू दिवटे  (वय55), रा.सिद्धार्थनगर ता.अहमदनगर , प्रकाश रमननलाल शहा (वय61) रा.आनंदीबाजार , जुने कोर्टाजवळ, ता.अहमदनगर ,

इमान ननीफ बागवान  (वय35) रा.पाटील गल्ली, भिंगार ता.अहमदनगर , निलेश रामदास भोसले (वय43) रा.गवळीवाडा,भिंगार ता.अहमदनगर ,बाबासाहेब सार्जन पडागळे (वय37) रा.राहुरी कारखाना ता.राहुरी, बाळू रामदास शिंदे  (वय45),रा.शिंपीगल्ली तेलीखुंट,ता.अहमदनगर , विजय चंदनमल मुनोत  (वय58) रा.विनायकनगर ता.अहमदनगर , युवराज भाऊसाहेब करंजुले (वय41) रा.मुकुंदनगर ता.अहमदनगर , अशा 29 जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे.तर बापू भास्कर गायकवाड रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी  हा  फरार झाला आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here