Jalna : नवीन एमआयडीसी कंपनीतील चोरी प्रकरणी तिघे जेरबंद

चोरीचा माल घेणाऱ्यांवरही चंदनझिरा पोलिसांची कार्यवाही 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना – राजुरी कंपनीतील साहित्य चोरी प्रकरणातील आरोपींचा शोध घेत पोलिसांनी झिंगा गॅंगच्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. सोबतच चोरीचा माल विकत घेणा-या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

सचिन झिगे असे या झिंगा गँगच्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून विकास झुंबर (रा. भाग्यनगर, मंगेश मुळे रा.विठ्ठलनगर), असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. तर 1) शेख फेरोज इस्माईल रा. साईनाथ नगर, 2) अब्दुल करीम शेख रा.बागवान नगरी,3)जुबेरखान चांदखान रा.चंदनझिरा, अशी चोरीचा माल विकत घेणा-यांची नावे आहेत.

MIDC तील राजुरी कंपनीमधील मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले अभिजीत खरात यांनी पोलीस ठाणे चंदनझिरा येथे दि.09/06/2020 रोजी पितळी ब्रास गिअर, बुश मेटल व इतर महत्त्वाचे मेटल साहीत्य चोरी गेल्याची तक्रार पोलीस ठाणे चंदनझिरा येथे दि.12/06/2020 रोजी दिली होती.

या गुन्ह्याचा छडा चंदनझिरा पोलिसांनी लावून, या सहा आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. तपासात चंदनझिरातील झिंगा गॅंगचा सराईत गुन्हेगार सचिन झिगे याने त्याचे साथीदार विकास याच्या सोबत चोरी केल्याची माहिती मिळाली. त्याआधारे कारवाई करीत पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. तसेच आरोपी शेख, व जुबेर खान यांनी विकलेला माल चोरीचा असल्याचे माहिती असून ही विकत घेतला. त्यामुळे त्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणात पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमाल, तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेला पितळी वस्तू तसेच गुन्ह्यात वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण 1 लाख 52 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिराचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले, ASI घोडे, नापोका प्रभाकर वाघ, गोविंद पवार, अजय फोके, अनिल काळे यांनी सदर कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here