Shrigonda : तहसील समोर उपोषणांचा पाऊस

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – शहरातील तहसील कार्यालयासमोर आज तब्बल ५ उपोषणे होती. त्यामुळे आज उपोषणाचा पाऊस पडला, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. 

श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी तब्बल ५ उपोषणे होती. त्यातील एकामध्ये खाकीबा डोंगरावर बेकायदा मुरूम मातीच्या उत्खननाबाबत तसेच शेतीच्या रस्त्यासाठी तर काही उपोषणात पोलिसांकडून झालेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळण्यासाठी बेमुदत उपोषणे सुरु केली होती.
मात्र, त्यातही गिरमकर उपोषणाला यांच्या उपोषणाला परवानगी नसल्याने पोलिसांनी त्यांना उपोषणास बसू दिले नाही. मात्र ४ उपोषणे दिवभर सुरु होती. मात्र, सायंकाळी तहसीलदार यांनी काही उपोषणे आश्वासन देऊन सोडवली. तर पोलिसांच्या विरोधात सुरु असलेली उपोषणे सोडण्यास प्रशासनाला सायंकाळी उशिरापर्यंत यश आले नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here