Shevgaon : ऊर्जामंत्री तनपुरे व आमदार राजळे यांनी बिबट्याच्या हल्यातील केसभट कुटुंबियांना दिला धीर 

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

ढोरजळगांव – शेवगाव तालुक्यातील वाघोली गावामध्ये बिबट्याने पवार आणि शेळके वस्ती परीसरातील संतोष केसभट यांच्या घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या शंभू संतोष केसभट या तीन वर्षांच्या मुलावर हल्ला करून जखमी केले आहे. ऊर्जामंत्री प्राजक्तदादा तनपुरे व आमदार मोनिका राजळे यांचेकडून केसभट कुटुंबियांना भेट देऊन धीर देण्यात आला. आमदार राजळे म्हणाल्या की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सतर्कतेने रहावे.

तसेच लहान मुलांकडे लक्ष द्यावे. शनिवारी दि.13 जून रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारात शेजारी असलेल्या मोठ्या बहिणीने ज्यावेळी बिबट्याने जबड्यात धरून ओढले त्याच वेळी शंभूच्या बहिणीणे शंभूचा एक पाय ओढून धरला. या झटापटीत पत्र्याच्या पडवीला धक्का लागून आवाज झाल्याने संतोष केसभट हे घरा बाहेर येऊन बिबट्याला हाकलले. शंभू ला बहिणीने अक्षरशः बिबट्याच्या तोंडातून ओढून काढले.

या दरम्यान बिबट्याच्या हल्यात मुलाचा एक कान तुटला असून डोक्यावर बिबट्याचा दात घुसल्याने मुलाला नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर रविवार रोजी मुलाचे ऑपरेशन करण्यात आले असून सायंकाळी मुलगा शुध्दीवर आला आहे. तर रविवार दुपारी या बिबट्याने याच परीसरात दातीर वस्तीवर मेंढपाळच्या शेळ्या वर हल्ला करून आपले शिकार बनवले आहे.

एक किलोमीटरच्या अंतरावर दुसरा हल्ला करून बिबट्याने मेंढपाळ नारायण दातीर व सहकारी घोंगडे यांच्या कळपावर दातीर वस्ती शेजारी बिबट्याने हल्ला करून एका शेळीला आपले शिकार बनवले आहे. मेंढपाळ यांनी लावलेल्या जातीमुळे बिबट्याला शेळी ओढून नेता आली नाही. परंतु बाहेर असलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून फरपटत नेले. बिबट्याच्या वावराने व दोन ठिकाणी झालेल्या हल्यात बिबट्याने वाघोली परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे. दरम्यान, रविवारी युवा नेते उमेश भालसिंग, सरपंच बाबासाहेब गाडगे यांनी वनविभागाच्या अधिकारी यांच्याशी संपर्क करून परीसरात पिंजरा लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here