भाजपा नेते माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन; जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा


राष्ट्र सह्याद्री।
जळगाव : भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्र शोकाकुल झाले आहे.

यावल तालुक्यातील भालोद येथील रहिवासी असलेले हरिभाऊ जावळे यांनी लोकसभेत भाजपाकडून दोनदा निवडून गेले होते. रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते.सहकार क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य असून मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची धुराही त्यंानी यशस्वीपणे सांभाळली होती. केळी उत्पादकांसाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यंाना राज्यातील कृषी विभागातील राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेली कृषी परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारीही त्याना सोपविण्यात आली होती.

दिनांक १ जून १९५३ रोजी जन्मलेल्या हरिभाऊ जावळे यांच्यावर जनसंघाचा खूप मोठा प्रभाव होता. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांच्यावर जळगाव जिल्हा करण्याचे जिल्हाध्यक्ष पद सोपविण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारार्थ मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्यांचे निधन झाल्याची वार्ता जळगावला येऊन धडकताच भारतीय जनता पक्षासह जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्र शोकाकुल झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here