!!भास्करायणः२४!! सुशांतची चटका लावणारी आत्महत्या…

1


Rashtra Sahyadri Article

भारतीय धिरोदात्त क्रिकेट कर्णधार महेन्द्र धोनीचा बायोपिक सादर करणारा युवा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली. यामुळे क्रिकेट जगताबरोबरच त्याचे चाहतेही हळहळले. तसे होणे स्वामाविकच. कारण आताच कुठे सुशांतच्या अभिनयाला धुमारे फुटू लागले होते. सिनेजगतात नाव होवू लागलं होतं. पण,नियतीला हे मंजूर नसावं. त्याने चुटका लावणारी एक्झिट घेतली.


सुशांतने आत्महत्या कां केली, याचे ठोस कारण सापडत नाही. पण चिञपट जगताला आत्महत्या विषय नवा नाही. गुरुदत्त पासून ते दिव्या भारती, श्रीदेवी असे अनेक दिग्गज नावे यात आहेत. त्यामुळे विवेचनाआधी फिल्मीदुनिया जाणून घेणे जरुरी आहे. फिल्मीदुनिया ही आपल्या सामान्य दुनेयेसारखी नाही. ही झगमगाटी दुनिया आहे. या बेगडी झगमगाटाला अनेक तरुण तरुणींना भूरळ पडते.


या दुनियेला मायानगरी असं नाव. या दुनियेत करिअर करायचं,तर वाट्टेल ते करायची तयारी ठेवावी लागते. दाम करी काम अशा ह्या दुनियेची रित आहे. हंसा वाडकर नामक अभिनेञीच्या जिवनपटावर ‘सांगते ऐका’ हा वास्तववादी सिनेमा निघाला होता. यात सिनेदुनियेतील वास्तवाचा पर्दाफाश करण्यात आला होता. नव्या पिढीला तो सिनेमा आठवणार नाही वा माहितही नसेल.
माञ, अगदी अलिकडचा विद्या बालन हिचा ‘डर्टी पिक्चर’ सर्वानाच आठवत असेल. बघितलाही आसेल.हा सिनेमा दाक्षिणात्य अभिनेञी सिल्क स्मिता हिचा जिवनपट आहे. यात फिल्मी दुनियातील हैवानीवृत्ती कोणताही आडपडदा न राखता दाखविली आहे.रोल मिळविण्यासाठी तिला शरीरसुखाची मागणी केली जाते. त्यासाठी तिला नशेच्याही नादी लावलं जातं. पण जसजसा तिच्यातील बहर जावू लागतो, तशी ती नकोशी होते. यातून आलेल्या नैराश्यातून व्यसनी बनते. शेवटी निर्दयी अमानवी दुनियेत एकेकाळी प्रसिध्दीच्या झोतात आसणारी सिल्क एकाकी बनते. हे एकाकिपण असह्य होते. शेवट झोपेच्या गोळ्या घेवून जिवनविराम घेते!
ही आहे झगमगत्या सिनेजगताची भयावह व क्रुर काळी बाजी. इथे पैसा हाच सर्वस्व. ग्लॕमरस राहाण्यासाठी मग कशाचीही तयारी. जोपर्यन्त पैसा व प्रसिध्दी आहे, तोपर्यन्तच ही दुनिया तुमची. जेव्हा ग्लॕमर गेलं की कोण तुम्ही हा जिवघेणा प्रश्न सवाल अस्वस्थ करतो. काही अभिनेञींनी तर आपल्याला भूलवून नको ते प्रसंग शूट करण्यापासून, बळजबरी करण्यात आल्याची तक्रार केली होती.
तर असे हे आहे. मायानगरीचं वास्तव. इथे येणारा अनेक स्वप्नं घेवून येत असतात. या दुनियेत सपनोंका सौंदागरांचा वानवा नाही. हे सौदागर अचूक सावज हेरतात आणि आपलं जाळं टाकतात. एकदा का सावज जाळ्यात,अडकलं, की मग सहजासहजी सुटका होणे अशक्य! हे दलाल जिथे मागणी असेल तिथे पुरवठा करतात. आपली दलाली घेतात आणि अनेक निष्पापांना अनैतिकतेच्या दलदलीत अडकवतात.

सिनेजगत सुरु झालं तेव्हापासून हा अनैतिकतेचा प्रवास सुरु होतो. अशी शिकार बनलेली शेकडो उदाहरणे आहेत. हे अभिनेञींच्याच बाबतीत घडते असे नाही, तर अभिनेत्यांच्या पदरीही हेच पडते. ही दुनिया गजबजलेली असली, तरी प्रत्येकजण गर्दीत एकाकी आहे. कोणी हुस्न का गुलाम तर कोणी नशेचा गुलाम होवून एकाकीपण घालविण्याचा प्रयत्न करतो. या दुनियेत राहायचं तर थाटमाट करावा लागतो. अन्यथा तो दारिद्रयरेषेखालिल समजला जातो.
थाटमाटासाठी पैसा लागतो. ते जमलं नाही की नैराश्य पाठीमगे लागते. आता टिन एजर्सचा जमाना आहे. त्यामुळे शरिराकर्षणाची बाजू पुढे येत आहे. पौगंडावस्थेत तथाकथित प्रेम जडते. पुढे पोक्तपणा आल्यावर दुसरीकडे मन भरकटते. घटस्फोट होतात. यातूनही मानसिक समस्या निर्माण होवून अनर्थ घडतो.

सुशांतच्याबाबतीत नेमके काय घडले हे पुढे येईलच. पण खुलण्याआधीच नियतीने डाव साधावा ,हे गलबलून टाकणारं आहे.छछोरे चिञपटात,”बेटा,तुम्हारा रिजल्ट तय नही करेगा की,तुम लुजर हो या विनर.यह तुम्हारी कोशिश तय करेगी…,”सुशांतचा ना रिजल्ट आला ना कोशिश करण्याला नियतीने त्याला संधी दिली!

भास्कर खंडागळे ,बेलापूर
(९८९०८४५५५१ )

1 COMMENT

  1. भास्क रा यान खूप छान सदर आहे मी नियमित वाचक ही. असेच दर्जेदार वैचारिक लिखाण उत्तोरोत्तर आम्हाला वाचायला मिळो हीच अपेक्षा हीच सदिच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here