Corona : श्रीरामपुरात कोरोना बाधित आढळलेली व्यक्ती कोण? सविस्तर वाचा…

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर : शहरातील कांदा मार्केट परिसरातील 78 वर्षीय व्यक्ती पुणे येथे रुग्णालयात कोरोनाबाधीत झाल्याने श्रीरामपूरमध्ये पहिलाच पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे.
शहरातील कांदा मार्केट परिसरातील बाधीत व्यक्तीचा अपघात झाला होता. त्यासाठी तो दि. 12 व 13 जून रोजी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारा दरम्यान त्याला दम्याचा त्रास होऊ लागल्याने एका डॉक्टरच्या सल्लयाने पुणे येथील खासगी रुग्णालयात तो गेला. दि. 15 रोजी त्याचा स्वॅब घेतला असता, दि. 16 रोजी तो पॉझिटिव्ह आल्याने आज त्याच्या दोन मुलांना पुण्यात कॉरनटाईन केले तर घरच्या 2 जणांसह खासगी रुग्णालयातील 4 अशा 6 जणांना तपासणीसाठी नगरला पाठविले आहे. त्यांना सध्या तरी कोणेतेही लक्षणे नसल्याचे सुत्रांकडून समजले. दरम्यान, आज प्रांताधिकारी अनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील, पो.उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक श्रीहरी बहिरट, आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्यासह कर्मचार्‍यांनी कांदा मार्केट परिसरात जाऊन तेथील लोकांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत.

पहिल्यांदाच शहरातील नागरिकाला बाधा

शहरामध्ये आतापर्यंत बाहेरील 2 व्यक्ती बाधीत आढळून आल्या होत्या. त्यामध्ये वडाळा महादेव येथे औरंगाबाद येथून आलेले 1 व गोंधवणी येथे भांडूप मुंबई येथून आलेले 1 असे 2 बाधीत सापडले होते. आता शहरातील पहिलीच व्यक्ती बाधीत आढळल्याने तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here