Cooperative election postponed: राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा तीन महिने लांबणीवर

0

Mumbai: कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सहकार विभागाचे अवर सचिव यांनी या संदर्भातील शासन निर्देश जारी केला आहे

सहकार विभागाने शासन आदेश प्रसिद्ध केला आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर शासनाने तातडीने पावले उचलत राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 3 महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय 18 मार्चला घेण्यात आला होता. 18 जूनला या आदेशाची मुदत संपणार होती, त्यामुळे एक दिवस आधी राज्य शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा सत्तेवर असलेल्या संचालक मंडळांना होणार आहे.

राज्यातील अनेक कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ, जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे, मात्र कोरोना संसर्गामुळे या संचालक मंडळांना एकूण सहा महिन्याची मुदतवाढ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here