Editorial : व्यवस्थेचा बळी

राष्ट्र सह्याद्री 18 जून

सुशांतसिह राजपूत हा हरहुन्नरी अभिनेता होता. सहजसुंदर अभिनय, अकृत्रिम संवादफेक आणि सेटवरचं त्याचं वागणं हे सारं नैसर्गिक होतं. महिंद्रसिंह धोनीची भूमिका एका चित्रपटात करताना त्यानं त्यासाठी केलेले परिश्रम सर्वांना माहीत आहेत. किरण मोरे यांच्यासोबत त्यानं दीड वर्ष धोनीच्या खेळण्याच्या पद्धतीचं अवलोकन केलं. मैदानावर जाऊन त्यानं क्रिकेटचे धडे गिरवले. त्याच्या त्यानंतरच्या खेळण्यानं तर काहींनी तो चांगला क्रिकेटर होऊ शकतो, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. अशा झोकून देऊन काम करणा-या सुशांतसिंह याने अनेक मालिका, चित्रपटात काम केलं. त्यानं अभिनयाचा ठसा उमटविला. अशा सुशांतनं आत्महत्या केल्याच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला आहे. तो तरूणांचा आवडता होता. तारुण्याच्या दृष्टीनं तो एक सजीव आणि आनंददायी व्यक्ती म्हणून ओळखला गेला. गेल्या सहा महिन्यांपासून तो नैराश्यग्रस्त होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. तो मातृभक्त होता. आईचं अकाली जाणं त्याच्या मनवर कोरलं गेलं होतं.

बॉलिवूडमध्येही आतला आणि बाहेरचा असा एक गट होता. सुशांतनं अभिनयाचा ठसा उमटवूनही त्याला बाहेरच्याची वागणूक दिली जात होती. त्यामुळं तर चित्रपटसृष्टीतील बड्या निर्मात्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून त्याला काम देणं बंद केलं होतं. अनेकदा चकरा घालून, बोलूनही त्याच्यावरचा बहिष्कार कमी झाला नाही. ‘पवित्र रिश्ता’मधील त्याची भूमिकाही गाजलेली होती. त्याचं ३४ वर्षे वय हे नक्कीच जाण्याचं नव्हतं. अजून त्याला जीवनात काही अजरामर अशा भूमिका साकारायच्या होत्या. त्याचा सहजसुंदर अभिनय, त्याचं दिसणं आणि बोलणं ही यात कुठंही कृत्रिमता नव्हती; परंतु प्रेमभंग, स्वप्नभंग, अपेक्षाभंग आणि नैराश्याच्या आहारी गेलं, की माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. सुशांतसिंह याच्या बाबतीत तेच घडलं असावं. त्याच्या घरी त्याचे काही मित्र आले असताना त्यानं त्याच्या खोलीत पंख्याला लटकून आत्महत्या करावी, यावरून मित्रही त्याचं समुपदेशन करण्यात कमी पडले असं मानायला जागा आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून सुशांतसिंह नैराश्यात होता. याची माहिती त्याच्या मित्रांना आणि कुटुबीयांना नव्हती का आणि असेल, तर त्याच्यावर तातडीनं मानसिक उपचार करण्यास का टाळाटाळ केली, हे प्रश्न उपस्थित होतात. त्याचं हे नैराश्य कुणाच्या लक्षात आलं नव्हतं का, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. सुशांतनं त्याच्या मित्राला अखेरचा फोन केला होता. तो कोण होता आणि फोन करण्याची वेळ काय होती? याचा आता पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे. तसंच त्याच्या घराचा दरवाजा तोडला, की व्यवस्थापकानं त्याच्याकडच्या किल्लीनं उघडला, याबाबतही परस्परविरोधी विधानं समोर आली आहेत. सुशांतनं तीन जून रोजी शेवटचं सोशल मीडिया पोस्ट केलं होतं.

या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी आईला आपल्या आयुष्यात काही राम राहिलेला नाही, असं लिहिलं होतं. याचा अर्थ त्याच्या मनात आत्महत्येचे विचार फार अगोदरपासून घोळत असावेत. सोशल मीडियावर अशी निराशाजनक पोस्ट टाकणा-या सुशांतनं 2019 मध्ये ‘छिचोरे’ या चित्रपटात खूप चांगली भूमिका साकारली होती. चित्रपटात तो एक पिता झाला, जो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या मुलाचं समुपदेशन करतो. स्वतःच्या आणि मित्रांच्या अपयशाच्या कहाण्या सांगून मुलाला अपयशातून बाहेर येण्यास मदत करतो. इतराचं समुपदेशन करणारा स्वतः मात्र तसं जगत नाही. खरंतर इतरांना समुपदेशन करणं सोपं असते; परंतु स्वतःवर जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र ते समुपदेशन आचरणात आणलं जात नाही. सुशांतच्या उदाहरणावरून ते प्रकर्षाने जाणवतं.

सुशांत अभ्यासातही अव्वल होता. अभियांत्रिकीच्या आठ पदव्या त्यानं मिळवल्या होत्या. सुशांतने बॅकअप डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली. टीव्हीवर त्याची पहिली मालिका बालाजी टेलीफिल्म्स ‘किस देश में है मेरा दिल’ होती. यात त्यानं प्रीत जुनेजाची भूमिका साकारली होती. यानंतर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली. जरा नच के दिख 2 आणि झलक दिखला जा 4 नृत्य रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो दिसला. नेटफ्लिक्सवर त्याचा शेवटचा रिलीज फिल्म आय ड्राईव्ह होता. काई पो चे, शुद्ध देसी रोमांस, पीके, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी, राब्ता, वेलकम टू न्यूयॉर्क, केदारनाथ, सोनचिरिया, चिचोरे, ड्राइव्ह आणि दिल बेचरा हे त्याचे चित्रपट.

पाच दिवसांपूर्वी सुशांतच्या माजी व्यवस्थापकानं आत्महत्या केली. दिशा सॅलियन यांनी मुंबईतील इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली.त्यानंतर सुशांतनंही तेच करावं, यासारखा दुर्दैवी योगायोग नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, दर वर्षी जगातील सुमारे आठ लाख लोक आत्महत्येचा मार्ग निवडतात. रशिया, भारत, काही युरोपीयन आणि आफ्रिकन देशांमध्ये आत्महत्यांचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत बरंच जास्त आहे. कुटुंबापासून एकटं राहणं, भविष्याबद्दल चिंता, असुरक्षितता, इतर लोकांनी अघोषित बहिष्कार टाकणं, आर्थिक समस्येसह कौटुंबिक समस्या आदीमुळं नैराश्य येतं. ते सुशांतच्या बाबतीतही घडलं असावं; परंतु याचा अर्थ जीवनातून पळ काढणं असा होत नाही.

बॉलिवूडनं नाकारलेल्या अनेकांनी वेगळ्या क्षेत्रात आपली चमक दाखवून दिली आहे; परंतु चित्रपट असो, की अन्य; काहींची नशा डोक्यात जाते. त्यातून बाहेर पडणं शक्य होत नाही. सुशांतचंही तसंच झालं असावं. आईच्या निधनानंतर त्याचं कुटुंबापासून थोडंसं अलग राहणं, एकाकीपणा आणि पवित्र रिश्तानंतर अंकिता लोखंडेशी झालेलं ब्रेकअप यातून सुशांत सावरलाच नाही. अभियांत्रिकीत देशात पहिल्या दहांत आलेल्या सुशांतला तिथं काही करणं शक्य होतं; परंतु त्यानं ती वाट बंदच करून टाकली. सुशांतची आत्महत्या ही कोणत्याही समस्येवर तोडगा नसून ती परिस्थितीशी सामना करत जगण्यात एक संघर्ष असतो आणि त्यातून मिळवलेलं यश हे बावनकशी असतं; परंतु त्याच्यावर उपचार करणा-यांनी आणि त्याच्या मित्रांनीही त्याला त्याची जाणीव करून दिलेली नसावी.

नैराश्यातील व्यक्तीची ओळख पटल्यानंतर, तिच्या जवळच्या नातेवाइकांची आणि प्रियजनांची जबाबदारी ब-याच प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत आत्महत्येचे विचार मनात येणा-याशी सातत्यां संवाद साधणं महत्त्वाचं असतं. त्याला एकटं सोडणं प्राणघातक ठरू शकतं. घरात आनंददायी वातावरण राखणं फार महत्वाचं असतं. उदासीनता आणि औदासीन्य यात खूप फरक आहे. काही काळ दुःख होतं; परंतु जेव्हा दुःख जास्त काळ टिकतं, तेव्हा ते औदासिनतेत रुपांतर होतं. त्यावर  शक्य तितक्या लवकर उपचार करणं आवश्यक असतं. सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते. असं असताना त्यानं एका खोलीत बंद करून घेऊन आत्महत्या करणं म्हणजे तर आणखी धक्कादायक आहे.

सुशांतसिंह याच्या आत्महत्येच्या बातमीनं चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी याच मार्गावरून गेल्याचे फ्लॅशबँक लगेच आठवलं. भारतात आत्महत्येचं प्रमाण सतत वाढत आहे. अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की जे लोक आत्महत्या करण्याचा मार्ग निवडतात, त्यांना सामान्यत: नैराश्य आणि तणाव असतो. असे लोक मित्र आणि कुटूंबापासून अंतर ठेवण्यास सुरवात करतात. मेडिकल सायन्स जर्नल ‘द लान्सेट’च्या मते तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. टीव्ही संस्कृतीमुळं परस्पर संवादाच्या कमतरतेमुळं पालकांना मुलांशी बोलण्यास मुळीच वेळ नसल्याचं मुलं आत्महत्या करतात. आत्महत्या ही कुठल्याही समस्येवर तोडगा नसून, एक भीतीदायक शब्द आहे. देशात, समाजात आणि घरात आता तो इतका रुळला आहे, की प्रत्येकजण त्यास घाबरत आहे.

प्रत्येक आत्महत्येस एक कारण असतं. एखादी समस्या न सुटल्यामुळं कुणी आत्महत्या करतं; परंतु त्याच्या आत्महत्येनं प्रश्न अधिकच गंभीर होते. प्रश्न सुटत नाही. कुटुंबीयांचं दुःख कमी होत नाही, उलट वाढतं. सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्तानं त्याच्या वडिलांवर आघात झाला. त्यांना रुग्णालयात भरती करावं लागलं. संबंधिताच्या आत्महत्येचं कारण नंतर समजून उपयोग नाही. त्याची समस्या नंतर जरी दूर केली, तरी त्याचा आनंद घेण्यासाठी तो या जगात असत नाही. आत्महत्या एखाद्या समस्येवर तोडगा नसून परिस्थितींचा सामना करणं, आव्हानं स्वीकारणं आणि त्यावर मात करणं हाच आत्महत्या टाळून पुढं जाण्याचा मार्ग आहे.

आत्महत्या ही समस्येशी झुंज देणारी जीवनाची समाप्ती आहे, समाधानासाठी नव्हे ज्यामुळे त्यांना मृत्यूला मिठीत घ्यावे लागते. खरं तर, आयुष्यापेक्षा काहीही दुखावले जात नाही किंवा दुखत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा सर्वकाही संपल्यासारखे दिसते, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःला संपवू. आमची समस्या अशी आहे की आपल्या दु:खाची तुलना इतर दु:खाशी न करता आपण सर्वात मोठे समजतो. जर आयुष्याला बर्‍याच वेळा लागतील, तर मग ते घ्या आणि सुरू ठेवा. जेव्हा एखादा ठिबक बुडण्याकरिता आधार बनू शकतो, तर मग आपण अंतिम प्रयत्न न करता अकाली मृत्यूला का बोलावे?

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here