Shrigonda : जिल्हाबंदीचा आदेश डावलून क्रीडा अधिकाऱ्याचा प्रवास, सकाळपासून पोलीस ठाण्यात बसून

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदीचे विशेष आदेश दिले आहेत. मात्र, त्याच्या या आदेशाला प्रशासनातीलच अधिकारी हरताळ फसताना दिसत आहेत. संगमनेरच्या नायब तहसीलदारांनी उल्लंघन केले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र, आज पुन्हा नगर जिल्हा क्रीडा अधिकारी महिलेने त्याची पुनरावृत्ती केली. मात्र, श्रीगोंदा तहसिल कार्यालयाच्या महसूल पथकाने गव्हाणे वाडी नजीक त्यांना ताब्यात घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनला सकाळपासून बसवून ठेवेल आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

काल अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी श्रीगोंदा तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियमाचे पालन न करणाऱ्या इसमांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तालुक्याचे तहसिलदार महेंद्र माळी यांनी अनेक भरारी पथकाची निर्मिती केली असून अशाच एका भरारी पथकाने अहमदनगर पुणे महामार्गावर गव्हाणे वाडी चेक पोस्टवर तपासणी चालू असताना त्यांना अहमदनगरची महिला क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी जिल्हाबंदी असताना पुणे ते नगर असा रोजचा प्रवास विनापरवाना, विना पास  करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महसुलाच्या पथकाने त्यांना आज सकाळी ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली होती.

फिर्याद कोण देणार यावरून गुन्हा दाखल होण्यास विलंब

सकाळपासून तब्बल दोन वाजेपर्यंत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले असून त्यांच्यावर नेमके कोण फिर्याद देणार यावर वाद विवाद चालू असून भरारी पथकाने फिर्याद दिली पाहिजे, असे मत पोलीस प्रशासनाचे आहे. तर घटना बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असल्याने याबाबत पोलिसांनी फिर्यादी व्हावे, असे महसूल प्रशासनाला वाटत असल्याने सकाळपासून अहमदनगरच्या क्रीडा अधिकारी नावंदे यास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसून गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत शंका कुशंका व्यक्त होताना दिसत  आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here