Jalna : अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करताना दुचाकीस्वारास पकडले

४७ हजाराचा मुद्देमाल जप्त; अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या पथकाची कारवाई 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

जालना – अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करताना दुचाकीस्वारास पकडले. त्याच्याकडून 47 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.  

आरोपी मंगेश रत्नाकर संकपाळ (वय २६, रा. काद्राबाद), असे अटक केलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

आज दुपारी मोतीबागेकडून मुक्तेश्वर तलावाकडे एक पांढऱ्या रंगाची विनाक्रमाकांची स्कुटी घेऊन एक इसम संशयास्पदरित्या वेगाने जात होता. या भागात पेट्रोलिंग करणाऱ्या अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या पथकाच्या ही बाब लक्षात आली. पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून स्कुटी पकडून झडती घेतली. त्यावेळी आरोपी मंगेश स्कुटीवर एका गोणीत मॅकडॉल्स रमच्या ४८ बाटल्या, ओसी ब्लूच्या ४८ बाटल्या दारू आढळून आली. यावेळी पोलिसांनी विदेशी दारू व स्कुटी असा ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, कदीम जालनाचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचारी प्रदीप घोडके, विशाल काळे, ज्ञानेश्वर केदारे, कदीम जालनाचे कर्मचारी साळवे, विठ्ठल खार्डे यांनी कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here