Shevgaon : अनधिकृत बांधकामांविरोधात चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शेवगाव तहसील कार्यालयासमोर शेवगाव शहरातील जैन गल्लीतील अनधिकृत बांधकामाच्या व पार्किंगच्या मुद्द्यावर आज चौथ्या दिवशीही ‌उपोषण चालू आहे.
शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजे भोसले यांचे आज चौथ्या दिवशीही शेवगाव तहसील कार्यालयासमोर सुरूच आहे. शेवगाव नगर परिषदेकडून कोणतेही ठोस आश्वासन किंवा कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे चौथ्या दिवशी उपोषण चालू आहे. उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय राजेभोसले यांनी घेतला.
व्यावसायिक इमारती उभ्या करताना नगररचना विभागाच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून या इमारतींचे बांधकाम केल्याचा आरोप राजेभोसले यांनी केला आहे. केलेले बांधकाम ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 52 नियम बाह्य आहे. बांधकामाची परवानगी घेताना घर बांधणे यांची परवानगी घेऊन नंतर व्यावसायिक इमारती उभ्या केल्या.
बांधकाम करताना तिन्ही बाजूंनी मोकळी जागा सोडणे आवश्यक असताना, ती सोडली गेली नाही. तसेच नगर परिषद या दुकानदारांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या इमारतीवर कारवाई करण्याची मागणी राजेभोसले यांनी केली आहे. आज उपोषण स्थळावर विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here