Ahmednagar : जिल्ह्यात आणखी तिघांना कोरोनाचा संसर्ग

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नगर : जिल्ह्यात आज सकाळी तीन कोरोना संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत. कर्जत तालुक्यातील राशीन, पारनेर तालुक्यातील भाळवणी आणि संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे हे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 269 एवढा झाला आहे. दरम्यान, आज सकाळी संगमनेर येथील एक रुग्ण कोरोनातून बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

पुण्याहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कांदिवली (मुंबई) येथून प्रवास करून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आलेल्या 68 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील 34 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी झाला होता दाखल झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here