Shrirampur : ट्रॅक्टरच्या धडकेने कोसळलेल्या भिंतीखाली दबून दोन चिमुकलींचा मृत्यू

3
श्रीरामपूर शहरानजीक घटना 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – ट्रॅक्टरचा भिंतीला धक्का लागून भिंत पडून त्या भिंतीखाली दबून दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना श्रीरामपूर शहरानजीकच्या बेलापूर गावातील बोंबले वस्तीवर गुरुवारी (दि.18) येथे घडली.    

भिंतीलगतच ऋतुजा बाळासाहेब गांगुर्डे  ( वय ४ ) व शृतीका बाळासाहेब गायकवाड (वय ६ ), अशी या चिमुकलींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर समजलेले वृत्त असे की, बेलापूर बु.येथील बोंबले वस्ती या ठिकाणी कसबे यांच्या नवीन घराचे बांधकाम चालू होते. घराच्या भिंतीचे दहा फूट बांधकाम पूर्ण झाले होते. त्या शेजारीच गांगुर्डे यांचा प्लाॅट आहे. या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने विटा टाकण्याचे काम चालू होते. ट्रॅक्टर सरकल्यामुळे तो नवीन बांधकाम केलेल्या भिंतीवर आदळला. त्यामुळे ती भिंत कोसळली. त्या भिंतीच्या बाजुलाच ऋतुजा व श्रृतिका खेळत होत्या. ट्रॅक्टरच्या धडकेने विटाचे बांधकाम असलेली भिंत या दोन लहान चिमुरड्यांच्या अंगावर कोसळली. त्यात दोघीही जागेवरच गतप्राण झाल्या.

घटनेची माहिती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आमदार लहु कानडे, सचिन गुजर, करण ससाणे यांनी गायकवाड व गांगुर्डे यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here