!!भास्करायणः२७!! चिनची नाकेबंदी केली पाहिजे!

भास्कर खंडागळे,बेलापूर – (९८९०८४५५५१)

गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या भोवतालची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. भारताला आपल्या शेजार धर्माविषयी वेगळी व ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यात म्हणजे बालाकोट ऑपरेशन नंतर पाकच्या आगळीक मंदावली आहे. माञ, त्याची भर चिन भरुन काढित आहे. 
जग सध्या कोरोना माहामारीचा मुकाबला करीत आहे. त्यात भारत, पाक, चिन देखिल आहेत. असे संकट असताना चिनने नव्या कुरापती सुरु केल्या आहेत. परवाच भारताचे पाचजण चिनशी लढताना शहिद झाले. भारतानेही याचा मुँहतोड जवाब दिला. असे असले तरी स्थिती भारतासाठी नक्कीच चिंताजनक आहे. कारण चिन हा पाकसारखा आर्थक व लष्करीदृष्या दुबळा नाही. त्यामुळे चिनी वस्तुंच्या बहिष्काराने राष्ट्रवादाचा हेतू सफल होण्यापलिकडे, काही साध्य होणार नाही. याचे कारणही तसेच आहे. यापूर्वी पाक हा भारताचा तसा एकमेव शञूराष्ट्र होता. पण गेल्या काही वर्षात चिन, नेपाळची भर पडली आहे. खरे तर नेपाळ हा भारताचा पारंपारिक मिञ. ही मैञी अगदी कालपरवापर्यंत टिकून होती. मग एकाएकी नेपाळ भारताचा शञू कसा बनला, याचे विवेचन आवश्यक आहे. नेपाळने कालापानी हा भारताचा भूभाग स्वतःच्या नकाशात दाखवून वेगळीच समस्या तयार केली आहे. विशेष म्हणजे हा भूभाग काबीज करावा, असे विधेयकच नेपाळी संसदेने संमत केले आहे.
इथे हा विषय गंभीर बनलाय. जो नेपाळ भारताच्या एका राज्याइतकाही नाही, तो भारताच्या भूभागावर अधिकार सांगतो. इतकेच नाही तर हा भूभाग संपादित करावा, असे विधेयक मंजूर करतो. याला काहिच आंतरराष्ट्रीय कंगोरे नसतील कां? तर नक्की आहे. नेपाळ भारताशी मैञी तोडून थेट आव्हानाची भाषा करतो, यात काहिच गुपित नाही काय? तर आहे. नक्कीच आहे. गेल्या काही वर्षात भारत अमेरीकेचा मिञ बनलाय. मोदी व ट्रम्प यांनी भारत, अमेरिकेला वेगळे आयाम दिलेत. हेच आयाम चिनची डोकेदुखी बनली आहे. अमेरिका कोरोनामुळे आर्थिक अडचणित आहे. ट्र्म्प यांच्याही प्रतिमेला तडा गेला आहे. तसाच भारताचीही अर्थव्यवस्था अडचणीत आहे. अशा स्थितीत भारत व अमेरिकेने एकमेका साह्य करु असे धोरण स्वीकारले आहे. ही चिनची खरी डोकेदुखी आहे. भारतासारखा शंभर कोटी ग्राहकांचा देश हातून जाणे चिनला परवडणारे नाही. यासाठीच चिनने नेपाळला हाताशी धरुन भारताच्या कुरापती काढायला सुरुवात केलीय.
कोरोना विषाणूबाबत चिन हा जगाच्या हिटलिस्टवर आहे. कोरोना हे चिनचे अपत्य असल्याचा जगाला संशय आहे. यामुळे चिन सध्या बॅकफूटवर गेलाय, तो या बदनामी व नामुष्कीमुळे. अमेरिकेने चिनी मालावर बहिष्कार घातलाय. चिनशी राजनैतिक संबंधही जवळपास तोडले आहेत. या बहिष्कारात भारतही उतरला आहे. या नव्या समिकरणाने चिनचा तिळपापड झाला आहे. यासाठीच चिन भारताबाबत नवी रणनिती तयार करीत आहे. जी भारताला परवडणारी नाही.
चिनने पाच मारले, आम्ही पन्नास ठोकले हा भ्रम आहे. या भ्रमात भारताने राहाता कामा नये. शक्यतो शेजारी राष्ट्राशी सर्वच देश सलोखा ठेवण्याचे धोरण आखतो. अमेरिका हा स्वतंञ खंड आहे,हे जाणले पाहिजे. भारताचे तसे नाही. भारताला पाक, अफगाण, चिन, भूतान, तिबेट, नेपाळ, म्यनमार, बांग्लादेश, श्रीलंका असे शेजारी आहेत. भारत हा एका अर्थाने खंडप्राय आहे. त्यात आजतरी भारताला भक्कम विश्वासू शेजारी नाही, हे लक्षवेधी सत्य स्वीकारावेच लागेल. याचाच अर्थ आजतरी भारत शञूराष्ट्रांनी घेरलाय, हे वास्तव स्वीकारुनच रणनिती ठरवावी लागेल. इथे मोदी सरकारची कसोटी लागणार आहे.
भारतात सध्या चिनविरोधी वातावरण आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे बेंबीच्या देठापासून सांगितले जातेय. भारत ही चिनची मोठी बाजारपेठ आहे. जवळपास शंभर कोटी ग्राहकांची बाजारपेठ आहे. अमेरिका ही बाजारपेठ काबिज करु इच्छिते. पण अमेरीकेला ते शक्य नाही. कारण अमेरीका शस्ञास्ञ व वाहन उद्योगात प्रगत आहे, चिनचे तसे नाही आरास, मोबाईल, लाईट माळा, खेळण्या अशा सर्वच वस्तुंचा चिन उत्पादक आहे. शिवाय चिनी उत्पादने ही जगात सर्वात स्वस्त आहेत. याला भारत व अमेरिकेकडे काय उत्तर आहे? दुसरे कोरोनाविरुध्द भारत जे औषध बनविते त्या हैड्रोक्सिक्लोराईड उत्पादनासाठीचा सत्तर टक्के कच्चा माल भारत चिनकडून आयात करतो. आता बोला!
या विवेचनावरुन एक लक्षात येईल की जागतिकीकरणात भारत, अमेरीका, चिन हा नवा बर्म्युडा ट्रॅन्गल अस्तित्वात आलेला आहे. या ञिकोणात सध्या व्यापारयुद्ध सुरु आहे. यात आर्थिक हितसंबंध गुंतले आहे, या अर्थकारणाच्या कोनात भारत अमेरिकेकडे झुकलाय. हे चिनला मान्य असणे शक्य नाही. त्यासाठीच चिन भारताचे नाक दाबून तोंड उघडण्याचा डाव साधित आहे. या पलिकडे दुसरे कारण असू शकत नाही. कारण चिनचे थोबाड फोडण्याइपत भारत नक्कीच सक्षम आहे. तेव्हा सर्वबाजूंनी नाकेबंदी केलीच पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here