Sushant Singh Rajput Sucide Case : यशराज फिल्म्सची होणार चौकशी; करण जोहर, भन्साळी, एकता कपूर, सलमान खानही आरोपीच्या पिंज-यात?

3

मुंबई पोलिसांचे पत्र

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी यशराज फिल्म्सची चौकशी होणार असून तसे पत्र मुंबई पोलिसांनी यशराजच्या मॅनेजरला पाठविले आहे. सुशांत सोबत झालेल्या करारांची माहिती कळविण्यात यावी तसेच हे सर्व कागदपत्र पोलिसांना सुपूर्द करण्यात यावेत, असे यात नमूद केले आहेत.

14 जूनला वांद्रे येथील राहत्या घरात सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या या कृतीमुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का तर लागलाच मात्र त्याचे अनेक चाहत्यांच्या मनाला सुशांतची आत्महत्या चुटका लावून गेली. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत याच्या नातेवाईकांनी आक्षेप नोंदवला आहे. त्याच्यावर दबाव टाकण्यात आला होता, असे त्यांचे म्हणणे आहे.

करण जोहर, भन्साळी, एकता कपूर, सलमान खानही आरोपीच्या पिंज-यात?

करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर, सलमान खान यांनाही आरोपींच्या पिंज-यात उभे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्वांच्या विरोधात सुशांतच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुशांतला 7 चित्रपटांमधून काढून टाकले गेले होते आणि त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले, असा आरोप बिहारच्या मुजफ्फरपूर न्यायालयात दाखल तक्रारीत करण्यात आला आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावत, विवेक ओबेरॉय, अभिनव कश्यप, अनुभव सिंह यांच्यासह सर्वसामान्य चाहत्यांनीही ट्विटरवर करण जोहर, सलमान खान यांच्याविरोधात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली होती. 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here