Jalna : चिनी साहित्याची होळी करून वस्तूंवर बहिष्कार घाला – आमदार बबनराव लोणिकर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना – चिनने लडाखच्या गलवान खोऱ्यात केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने चिनला चोख प्रत्यूतर देत चीनच्या 43 जवानांना कठंस्नान घातले. मात्र, या चकमकित भारतीय 20 जवान शहीद झाले. याच्या निषेधार्थ चिनी साहित्याचा वापर न करता त्याचा पूर्णपणे बहिष्कार घालावा, असे आवाहन आमदार बबनराव लोणिकर यांनी केले.

परतूर येथील महादेव मंदिर चौकात चिनचे राष्ट्रध्यक्ष सि झिंपिंग यांच्या पुतळयाचे दहन व चिनी साहित्याची होळी करण्यात आली. याप्रसंगी लोणीकर बोलत होते. यावेळी भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राहूल लोणिकर, रंगनाथ येवले भगवानराव मोरे, डॉ.सुखराज कोटेचा, द.या.काटे, दिलीप होलाणि, डॉ.संजय पूरी, ओम मोर, संपत टकले, शत्रूघ्न कणसे, राजू मुंदडा, कृष्णा आरगडे, डॉ.स्वप्नील मंत्री, शामसुंदर चीतोडा, सू.द.शिवनगिरीकर, अजीत पोरवाल, राजेश वाघमारे, मंगेश वाघमारे, अभिषेक सोंळके, कुष्णा कुरधने, अमोल अग्रवाल, गणेश खवल, सुर्यभान कदम, जयकिशोर अग्रवाल, गणेश सोंकके, अमर बगडीया, शूभम कठोरे आदी उपस्थित होते.

पूढे बोलताना ते म्हणाले की, चीनची मुजोरी भारत खपवून घेणार नसून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व भारतीय लष्कराला जशास तसे उत्तर देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यत्वे करून भारत ही चीनसाठी सर्वात मोठी बाजार पेठ आहे. दैनदिन गरजांच्या वस्तू खरेदी करण्यास बंदी घातल्यास चिनची मस्ती उतरेल अशा शेलक्या शब्दात आपला क्रोध व्यक्त केला. तसेच आपल्या मोबाइलमध्ये चीनी अॅपचा सर्वात जास्त भरणा असून आपण हे सर्व अॅप काढून टाकत भारतीय अॅपचा वापर करावा, असे ही ते म्हणाले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here