Corona updates : कर्जत- राशीन येथील ‘त्या’ सहा व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटीव्ह – डॉ संदीप पुंड

प्रतिनिधी | राष्ट्रसह्याद्री दि १९

कर्जत : राशीन येथील कोरोना बाधीत ६० वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील सात व्यक्ती पैकी सहा व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली. त्यामुळे राशीनकराना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र २० जुनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहे. 

राशीन येथील ६० वर्षीय व्यक्ती वैद्यकीय कारणाने पुणे येथून प्रवास करून राशीन येथे आली होती. मात्र त्यास त्रास होत असल्याने तसेच कोरोना सदृश लक्षणे आढळत असल्याने त्यांचा स्वब घेण्यात आला होता. गुरुवारी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मागील आठवडयातच कोरोनामुक्त झालेल्या राशीनकराना मोठा धक्का बसला होता. या व्यक्तीच्या संपर्कातील राशीन येथील सात व्यक्तींना स्वब तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते.
शुक्रवारी, दि १९ रोजी दुपारी यापैकी सहा व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने राशीनकरासाठी मोठा दिलासा देणारी बातमी ठरली. तर अद्याप एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाधीत असलेल्या व्यक्तीचा परिसर स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधित केला असून राशीन येथील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार आणि दुकाने शनिवार अखेर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील राशीन आणि कोरोना समीकरणच 

कर्जत तालुक्यात आजतागायत कोरोना रुग्णाची एकूण संख्या नऊ झाली असून त्यापैकी आठ रुग्णाची नोंद राशीन शहरातील आहे. त्यामुळे कोरोना आणि राशीन यांचे समीकरणच निर्माण झाले आहे. मात्र राशीनकरानी त्यावर यशस्वीपणे मात करीत लढाई जिंकली आहे. त्यामुळे राशीन आणि परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे अनिवार्य बनले आहे. 

राशीनकरांना दिलासा तर श्रीगोंदेकरांची अडचण 

राशीन येथील कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा येथील १० व्यक्ती आल्या होत्या. त्यांना गुरुवारी कोरोना चाचणी स्वॅब तपासणीसाठी अहमदनगर येथे रवाना करण्यात आले होते. यापैकी दोन व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून सात व्यक्ती निगेटीव्ह निघाल्या. एका व्यक्तीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. यामुळे राशीनकराची दिलासादायक बातमी श्रीगोंदेकरांसाठी मात्र अडचणीची ठरली आहे.


3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here