Beed : आंतरराष्ट्रीय योग दिन घरामध्ये योग करुन साजरा करावा – जिल्हाधिकारी रेखावार यांचे आवाहन

3
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
बीड जिल्हयातील सर्व नागरिकांनी योगाचे महत्व लक्षात घेऊन दिनांक 21 जून 2020 रोजी सकाळी 7 ते 7:45 या दरम्यान स्वत:च्या घरात अथवा हद्दीत योग करुन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  राहुल रेखावार केले आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 65 व्या “मन की बात” या कार्यक्रमात याबाबत आवाहन केले आहे. योगाने जगभरात महत्व स्वीकारले असून 21 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून घोषीत केलेला आहे. गत 05 वर्षापासून देशात, राज्यात व जिल्हयात योग दिन मोठया प्रमाणात साजरा करण्यात येतो. 5000 वर्षाहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे.  ज्या लोकांना माहिती नव्हती अशा लोकांना “कोरोना संकटाच्या वेळी हॉलिवूड ते हरिद्वारमधील लोकांना योगाच्या फायद्याविषयी जाणीव झाली आहे. लोक योगाबद्दल शिकत आहेत. योग समुदायासाठी, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि ऐक्यासाठी चांगला आहे. कोरोना संकटाच्या काळात योगाचे महत्व वाढले आहे.

योग प्रामुख्याने श्वसन व रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करतो. गतवर्षी प्रमाणे यावर्षी “योग दिन” हा प्रत्येकाने कोरोना बाबत निर्देशाप्रमाणे स्वत:च्या घराच्या हद्दीत अथवा घरात सामाजिक अंतर ठेवून दिनांक 21 जून 2020 रोजी सकाळी 7 ते 7:45 वाजे दरम्यान योगा करावा.

या अनुषंगाने जिल्हयातील नागरिकांनी दिनांक 21 जून 2020 रोजी सकाळी 7 ते 7:45 या दरम्यान स्वत:च्या घराच्या हद्दीत अथवा घरात योग करुन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा असे क्रीडा विभागाच्या वतीने अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here