Jamkhed : अखेर ‘त्या’ 10 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अखेर त्या 10 नगर सेवकाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला. खूप दिवसापासून या हालचाली सुरू होत्या. परंतु नेमका निर्णय घेतला नाही. कारण यापूर्वी हे सर्व नगरसेवक भाजपच्या आदेशानुसार काम करत होते. परंतु राम शिंदे याचा पराभव झाल्यानंतर नगरपरिषदेमध्ये सत्ता परिवर्तन होणार हे नक्की होते. परंतु काही दिवस सत्ताधारी नगरअध्यक्ष व काही नगरसेवक याच्यावर राजीनामा देण्यास राजकिय दबाव आणला जात होता. परंतु अचानक राजकीय उलथापालथ झाली व सर्व म्हणजे त्या 10 नगरसेवक व नगर अध्यक्ष निखिल घायतडक यांनी सत्ता सोडण्यापेक्षा घर वापसी होण्याचा निर्णय घेतला व आज दुपारी आमदार रोहित पवार याच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

यामुळे आता नगर परिषदेतत एक पक्षीय सत्ता आली. त्यामुळे नाराजीचा सूरच राहिला नाही. यात माजी मंत्री राम शिंदे यांना सत्ता नसल्याने काहीच खेळी करता आली नाही. त्यामुळे जामखेडमध्ये भाजप आता तरी वर डोक काढू शकत नाही, अशी चर्चा आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जामखेडमध्ये दोन तीन नेते वगळता इतर नेताच राहिला नाही. आता ख-या अर्थाने जामखेडचा विकास होऊ शकतो. त्यामुळे आता दबावाचे राजकारण राहिले नाही. त्यामुळे आज सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला.

नगर आध्यक्ष निखिल घायतडक म्हणाले की भाजपची सत्ता गेल्यापासून व राम शिंदे याचा पराभव झाल्यानंतर नगर परिषदेमध्ये दबाव आणला जात होता. आपण विकास कामे करण्यासाठी भाजपची हात मिळवणी केली होती. जामखेडचा नगर परिषदेमार्फत विकास करणे हा आपला उद्देश होता आणि आहे. विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी घर वापसीचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

8 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here