Beed : ‘फळ पिक विमा मृग बहार’ योजनेंतर्गत शेतक-यांना तीन वर्षांसाठी मिळणार सुरक्षा कवच

वाचा काय आहे नेमकी योजना
बीड – जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना मृग बहार मोसंबी, डाळिंब, संत्रा, लिंबू आणि चिकू या फळांकरिता पुढील तीन वर्षासाठी राबविण्यात येणार आहे.
मृग बहार 2020 ते  2023 या तीन वर्षासाठी बीड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत  राबविण्यात येणार आहे. संत्रा, मोसंबी, लिंबू या फळ पिकाचा हप्ता उतरविण्याची तारीख दिनांक 24 जून 2020 चिकू या फळा करिता 30 जून 2020 डाळिंब फळ पिकाकरिता 14 जुलै 2020 अशी आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे ही योजना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत बीड जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब,संत्रा, लिंबू, चिकू या फळा पीका करिता राबविण्यात येणार आहे.


पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठी ही योजना ऐच्छिक आहे.केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे.कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. त्यासाठी अधिसूचित फळ पिकाचे उत्पादनक्षम वय पुढील प्रमाणे राहील.
अधिसूचित फळपीक उत्पादनक्षम  संत्रा व मोसंबी 3 वर्षे,चिकू 4 वर्षे,डाळिंब 5 वर्षे या योजनेत विमा हप्ता वास्तवदर्शी दराने आकारला जाणार असून विमा हप्ता रक्कम फळपीकनिहाय प्रती हेक्टरी पुढीलप्रमाणे आहे
फळपिके संत्रा विमा संरक्षित रक्कम 8 हजार रुपये शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम 4 हजार रुपये विमा उतरविण्याचा अंतिम दिनांक 24 जून 2020,
लिंबू 7 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम 7 हजार रुपये शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम 3500 रुपये,मोसंबी विमा संरक्षित रक्कम 8 हजार रुपये शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम 4 हजार रुपये,चिकू विमा संरक्षित रक्कम 6 हजार रुपये शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम 3 हजार रुपये विमा उतरविण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2020
, डाळिंब विमा संरक्षित रक्कम 1,30,000 शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम 30000 विमा उतरविण्याची अंतिम तारीख दिनांक 14 जुलै 2020.
फळपिकांसाठी समाविष्ट हवामान धोके व संरक्षण कालावधी पुढील प्रमाणे आहे.फळ पिकाचे नाव संत्रा समाविष्ट हवामान धोके विमा संरक्षणाचा कालावधी संत्रा कमी पाऊस विमा संरक्षणाचा कालावधी दिनांक 15 जून ते 15 जुलै 2020 पावसाचा कालखंड दिनांक 16 जुलै ते 15 ऑगस्ट 2020,लिंबू कमी पाऊस 15 जून ते 15 जुलै पावसाचा कालखंड 16 जुलै ते 15 ऑगस्ट,मोसंबी कमी पाऊस दिनांक 1 जुलै ते 31 जुलै 2020 पावसाचा कालखंड 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2020, चिकू जास्त आद्रता व जास्त पाऊस 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2020 जास्त पाऊस व आर्द्रता 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2020,डाळिंब जास्त पाऊस व आद्रता दिनांक 16 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2020 जास्त पाऊस व आर्द्रता 1 ऑक्‍टोबर ते 15 डिसेंबर 2020,

योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बँके शिवाय कॉमन सर्विस सेंटर सी.एस.सी. आपले सरकार सेवा केंद्र तसेच ऑनलाइन नोंदी मार्फत अर्ज व विमा हप्ता भरण्याची सुविधा असून सहभागी होणाऱ्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आधार कार्ड आधार नोंदणी प्रत सातबारा उतारा बँक पासबुक ची प्रत तसेच जियो टॅगिंग केलेला फोटो व अधिसूचित फळ पीक असल्याबाबतचे स्वघोषणापत्र इत्यादी कागदपत्रे सादर करून प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे. 
याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी विमा कंपनीचे तालुकास्तरावरील प्रतिनिधी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. अंतिम मुदततिची वाट न पाहता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन राजेंद्र निकम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here