Shevgaon : मनसेकडून चीनचा राष्ट्रध्वज जाळून गालवान घाटी हल्ल्याचा निषेध

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – गालवान घाटीमध्ये चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. यात अनेक भारतीय जवान शहीद झाले. याचा निषेध म्हणून आज शेवगांव शहरातील क्रांती चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे व जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत याच्या नेतृत्वाखाली चीनचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला. 

शेवगाव येथील क्रांती चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चीन सरकार व चीनच्या सैनिकांविरोधात विरोधात जोरदार घोषणा बाजी करत चीनचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला. यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे उपजिल्हा अध्यक्ष गोकुळ भागवत, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष अमोल पालवे, शहरउपाध्याक्ष सुनील काथवटे, संदीप देशमुख, देविदास हुशार, नवनाथ भागवत, विठ्ठल दुधाळ, बाळा वाघ, रवींद्र भोकरे, ज्ञानेश्वर कुसळकर, विलास सुरवसे यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here