Corona Updates : Ahmednagar Breaking : सारसनगरमधील एकाला कोरोना; जिल्ह्यात सहा रुग्ण

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
नगर : जिल्ह्यात आज कोरोना संसर्गाचे ०६  रुग्ण वाढले आहेत. संगमनेर तालुक्यातील ०३, पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एक जणाचा यात समावेश आहे. 
मूळचा झारखंड येथील असलेला आणि नगर शहरातील सारसनगर येथे राहणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तिला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कर्करोगावरील उपचारासाठी मुंबई येथे हा रुग्ण प्रवास करून आला होता. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २८२ झाली आहे.
संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात आज ५९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच घुलेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष आणि जोर्वे येथील ४५ वर्षीय पुरुषालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी झाले होते दाखल.
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एकाच कुटुंबातील दोन मुलींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना हा संसर्ग झाला. अकरा जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील ०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामध्ये संगमनेर येथील ०२ तर नगर शहरातील सारसनगर आणि बोल्हेगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३७ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here