National : पंतप्रधान म्हणतात सीमेवर घुसखोरी झाली नाही!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

गलवान खो-यात चीनकडून झालेल्या हल्ल्यात आपले 20 जवान शहीद झाले. यावर संपूर्ण देशात चीनने केलेल्या घुसखोरी विरोधात संतापाची लाट उसळत असताना पंतप्रधान यांनी शुक्रवारी झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत “आपल्या सीमेत ना कुणी घुसखोरी केली ना कुणी आपल्या पोस्टवर ताबा मिळवला.”, असे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यानंतर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण गलवान खो-यातील हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांनी जे वक्तव्य केले होते ते याच्या अगदी उलट आहे. ”6 जून रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचा तणाव करण्याबाबत दोन्ही देशांच्या मिलिट्री कमांडरची बैठक झाली. त्यात अनेक मुद्द्यांवर सहमती झाली होती. पण ही प्रगती दिसत असतानाच चिनी बाजूने नियंत्रण रेषेच्या भारतीय हद्दीत एक बांधकाम उभारण्याचा प्रयत्न झाला. यावरुनच वाद सुरु झाला आणि नंतर चीनने आधीच कट केल्याप्रमाणे ही हिंसा घडवली,” असे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले होते.

मात्र, आता पंतप्रधानच म्हणत असतील की चीनने घुसघोरी केली नाही तर गलवान खो-यातील घटनेला भारतच जबाबदार आहे, हा चीनचा दावा आपण कसा खोटा ठरवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here