Shrigonda : देवनदीत पोहायला गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – देवनदीत पोहायला गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. 

अविनाश गणेश तोरडमल (वय ८ वर्षे), असे मयत मुलाचे नाव आहे.

भिंगाण येथील इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा अविनाश आपल्या मित्रांबरोबर आज सकाळी देवनदीमधील एका डोहामध्ये पोहावयास गेला होता. पोहताना सदर डोहात तो बुडाला. त्याच्या इतर मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्याच्या नाकातोंडात पाणी गेले होते.

अविनाशला श्रीगोंद्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल रोहिदास झुंजार अधिक तपास करीत आहेत.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here