Beed : गुरुपौर्णिमेनिमित्त नाणिज दक्षिण पीठाचे नरेंद्राचार्य महाराज करणार ऑनलाईन मार्गर्दशन

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

गजलक्ष्मी एपीके हे अॅप डाऊनलोड करून इव्हेंट जॉईन करू शकता

बीड – नाणीज दक्षिण पीठाचे परमपूज्य स्वामीजी महाराज नरेंद्राचार्य सोमवारी (दि.22) संध्याकाळी साडेसहा वाजता ऑनलाइन दर्शन देणार आहेत. तसेच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी परमपूज्य स्वामीजींच्या दर्शनाचा लाभ ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी गजलक्ष्मी नावाचा एपीके मध्ये “अध्यात्म” या मेनूला क्लिक करावे. आपले बुकिंग करावे बुकिंगसाठी ११ रूपये चार्जेस आहे. ऑनलाइन पेमेंट करावे म्हणजे आपले बुकिंग होऊन त्याची रिसीट मिळेल. “इव्हेंट जॉइंट करे ,” या बटनावर क्लिक करून गुरु दर्शन पाहू शकता.

आपण हा प्रोग्राम आपल्या मोबाईलमध्ये पाहतो. ज्यांच्याकडे अँड्रॉईड बेस टीव्ही आहे ते लोक टीव्हीमध्ये मोबाईलवरुन कास्ट किंवा मिरर करुन पाहू शकतात. त्यामुळे चित्र मोठे दिसेल आवाज चांगला येईल अनेक लोक एकाच वेळी पाहू शकतील‌. तरी या, “अध्यात्म” सुविधेचा लाभ घ्या. ज्यांच्यापाशी गजलक्ष्मी एपीके नाही त्याने गुगल प्ले मधून “गजलक्ष्मी एपीके” डाऊनलोड करून घ्यावा आणि बुकिंग करावे. ज्यांना ऑनलाईन पेमेंट भरण्याची सुविधा नाही किंवा बुकिंग करता येत नाही. त्यांनी दुसऱ्याच्या एपीकेमधून स्वतःसाठी सुद्धा बुकिंग करून घेता येईल, मात्र अशावेळी “किसी अन्य व्यक्ती के लिये बुकिंग करे” या मेनूला क्लिक करावे. येथे  ज्या व्यक्तीसाठी  बुकिंग करत आहोत त्याचा फोन नंबर न चुकता  नोंदवावा. म्हणजे ज्यांच्यासाठी बुकिंग केले आहे त्याच्या मोबाईलमध्ये मेसेज येईल. लिंक जाईल त्याने सदरची लिंक आपल्या मोबाईलमध्ये क्लिक करावी आणि गजलक्ष्मी एपीके डाऊनलोड करून घ्यावा. युजरनेम, पासवर्ड त्या मेसेजमध्ये दिलेला असतो. तसेच त्याला यूजर नेम, पासवर्ड बुकिंग पावतीवरही दिलेला आहे. तो ज्याने बुकिंग केले आहे त्यांच्याकडून मागून घ्यावा आणि त्या यूजर आणि पासवर्डचा उपयोग करून आपल्या मोबाईलमध्ये सदरचा एपीके ओपन करावा. 22 तारखेला साडेसहा वाजता बरोबर या मोबाईलमध्ये गुरुदर्शन प्रोग्राम दिसू लागेल.

यानंतर दुसरा नवीन program 23 तारखेला गुरुपौर्णिमा बुकिंग सुरू होत आहे. ज्यांना दरवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमेचे पूजा करायचे आहे त्यांनी गुरुपौर्णिमा हा इव्हेंट तेवीस तारखेला बुक करावा. 23 तारखेपासून गुरु पूजा विधि  साठी बुकिंग सुरू होणार आहे. ज्यांनी  गुरुपूजन  इव्हेंट  बुकिंग केला आहे  त्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजता आपले एपीके मध्ये लॉगिन करून श्रीक्षेत्र नाणीज येथे परमपूज्य माऊलींचे गुरुपूजन सुरू होईल हे गुरुपूजन आपण आपल्या घरी या एपीके मार्फत करू शकतो.

श्रीक्षेत्र नाणीज येथून गुरुजी आपल्याला जी कृती सांगतील ती कृती आपण तिकडे करायची आहे. त्यासाठी ज्या प्रमाणे नाणीजला गुरुपौर्णिमे करता भक्त शिष्य साधक पूजेचे साहित्य आणतात आणि सौचे गुरुजींनी सांगितल्यानंतर साहित्याची मांडणी करतात, गुरुजी जसा मंत्र म्हणतील, त्याप्रमाणे कृती सांगतात, तसेच यावेळी केले जाणार आहे. फरक एवढाच गुरुपौर्णिमा इव्हेंट बुकिंग करणारा आपल्या घरी मोबाईलवर किंवा टीव्हीवर हे सारे पाहात असेल ऐकत असेल आणि त्याप्रमाणे घरी बसून पूजा विधी ची कृति करेल. तरी ज्या भक्त साधक शिष्य यांना गुरु पौर्णिमा पूजा करायची असेल त्यांनी गजलक्ष्मी एपीके मधून अध्यात्म मेनूमध्ये 23 तारखे नंतर बुकिंग करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here