Shevgaon : रॉंग साईडने गाडी चालवणे जीवावर बेतले; मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव –  रॉंग साईडने गाडी चालवणे एकाच्या जीवावर बेतले. मालट्रकची धडक बसून चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराच मृत्यू झाला. हा अपघात शहरातील मुख्य रस्त्यावर आंबेडकर चौक ते क्रांती चौक दरम्यान आज शनिवारी सकाळी घडला. 

कदीर फत्तूभाई सय्यद वय 40 (रा. इंदिरानगर), असे मयताचे नाव आहे.

शेवगाव शहरातील आंबेडकर चौक ते क्रांती चौक येथून आलेले वाहन आंबेडकर चौकाकडे घेऊन जाण्यासाठी क्रांती चौकातून जावे लागते. मात्र, खूप लांबून जाण्याचा त्रास वाचवण्यासाठी मयत कदीर यांनी आपल्या दुचाकीवरून रॉंग साईडने आंबेडकर चौकात जात होते. यावेळी समोरून येणा-या मालट्रकने (MH 17 CT 4751) त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

धडक बसल्याने ते दुचाकीवरून पडून मालट्रकच्या माकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. दरम्यान, त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने उपचारासाठी नगरला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

राँग साईडने जाणे नित्याचेच

क्रांती चौकातून वाहन पुन्हा आंबेडकर चौकाकडे न्यायचे असल्यास सर्व रस्ता फिरून जावे लागते. मोची गल्लीतून येणा-या रस्त्याचीही हीच स्थिती आहे. इतका मोठा युटर्न घेण्यापेक्षा अनेक दुचाकी चालक राँग साईडने आंबेडकर चौक गाठतात. मयत कादीर यांनीही आज तेच केले असता राँग साईडने जाणे त्यांच्या जीवावर बेतले. त्यामुळे जनतेतून अशा अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here