Science Interest : Solar Eclips : योग दिनाच्या दिवशी सूर्यग्रहणाचा योग आणि संपणार कोरोनाचा रोग?

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

उद्याचा रविवार खूप खास असणार आहे. त्याला कारणही तसेच 21 जून ही खूप विशेष तारीख. या तारखेला आपण उद्या आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. कारण या दिवशी सर्वात मोठा दिवस असतो आणि सर्वात छोटी रात्र असते. हा सहावा योग दिवस आपण साजरा करणार आहोत. याच दिवशी म्हणजे उद्या या वर्षातील दुसरे सर्वात मोठे कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. हा ही एक मोठा योगच आहे. 

सकाळी 9.15 वाजता आंशिक सूर्यग्रहण सुरू होऊन 10 वाजून 17 मिनिटांनी संपूर्ण कंकणाकृती सूर्य ग्रहण दिसणार आहे. 12 वाजून 10 मिनिटांनी सूर्यग्रहण सर्वात जास्त दिसणार असून यावेळी सूर्याचा मधला भाग संपूर्ण झाकला जाणार आहे. भारतातील काही भागात पूर्ण कंकणाकृती सूर्य ग्रहण दिसणार असून काही भागात अंशिक सूर्य ग्रहण दिसणार आहे.

डायमंड रिंग दिसणार

उद्या होणारे सूर्यग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. हे दृश्य फारच विलोभनीय असते. चंद्राची छाया सूर्याचा 99 टक्के भाग झाकोळून टाकते. आणि फक्त कडेचा भाग प्रकाशमान असल्याने डायमंड रिंग तयार झालेली दिसते. हे दृश्य फारच कमी वेळा पाहायला मिळते. त्यामुळे उद्याचा आकाशातील हा सावल्यांचा खेळ पाहायला विसरू नये

कसे पहावे सूर्यग्रहण

सूर्यग्रहण हे चंद्रग्रहणाप्रमाणे उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे गॉगल वापरले जातात किंवा एक्सरे मधूनही हे ग्रहण पाहता येते.

सूर्यग्रहणापासून संपणार कोरोनाचा रोग?

गेल्या वर्षातील शेटचे सूर्यग्रहण डिसेंबर मध्ये झाले होते. या सूर्यग्रहणानंतरच पृथ्वीवर कोरोना या रोगाचा फैलाव सुरू झाला. या सूर्यग्रहणानंतर पृथ्वीच्या वातावरणात अनेक बदल होऊन कोरोना विषाणूला पोषक वातावरण तयार झाले. ते या सूर्यग्रहणानंतर पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा बदल होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार, असा दावा अनेक वैज्ञानिकांनी केला आहे.

सूर्यग्रहणाचा अभ्यास करणा-या शास्त्रज्ञांच्या मते उद्याच्या सूर्यग्रहणानंतर कोरोना या प्रोटिनच्या थराला मारक असे वातावरण तयार होईल. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार. गेल्या वर्षाच्या शेवटी झालेल्या सूर्यग्रहणाचा आणि कोरोनाचा अतिसुक्ष्म पातळीवर थेट संबंध आहे. असा दावाही काही वैज्ञानिकांनी केला आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here