Shrigonda : येळपणे येथील खंडोबा मंदिरातील दागिने चोरी प्रकरणी अल्पवयीन मुलासह चौघांना अटक

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – येळपणे येथील खंडोबा मंदिरातील दागिने चोरी प्रकरणी अल्पवयीन मुलासह चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी बेलवंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

१ ) हर्षद ऊर्फ हर्षा हबऱ्या काळे (वय 2९),  २ ) संतोष ऊर्फ सक्तेश रकड्या भोसले (वय २९ रा.देलवाडी ता.दौण्ड जि.पुणे) 3) श्रीखंड्या जिवलाल चव्हाण (वय ३५ रा.रेणुका माता मंदिरामागे, केडगाव अ.नगर) 4) एक अल्पवयीन
साथीदार यांना अटक केली आहे.

येळपणे गावालगत खंडोबा मंदिराच्या बंद दरवाजाचे बाहेरील कडी कोयंडा तोडुन १३जून  रोजीचे सकाळी ४.३० वा च्या पूर्वी अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करुन लोखंडी तिजोरीत ठेवलेले एक लाख  किंमतीचे चांदीचे व पितळी पंचधातुचे खंडोबा देवाचे मुखवटे, चांदीचे लहान मोठे घोडे, सोन्याचा बदाम, सोन्याचे दोन मनी मंगळसूत्र, असा मुददेमाल चोरुन नेला होता. मंदिराचे पुजारी  किसन शंकर साबळे वय -६० रा – येळपणे यांनी  फिर्याद दिली होती.

गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, यांनी सूचना दिल्यावर स्थानिक गुन्हेचे पो निरीक्षक दिलीप पवार यांना तांत्रिक व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा हर्षा काळे रा. देऊळगाय सिद्धी याने व त्याचे साथीदारांनी केला आहे. सदर खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव सिद्धी येथे जाऊन आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती घेतली असता हा आरोपी देऊळगाव सिद्धी येथील डोंगर भागात लपून बसला असल्याची माहिती मिळाली.
पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा लावून व पाठलाग करुन आरोपी हर्षद ऊर्फ हर्षा हबऱ्या काळे याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर पुन्हा त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे सांगून आरोपी संतोष व श्रीखंड्या यांची नावे व माहिती दिली. तसेच एका अल्पवयीन साथीदाराची माहिती दिली. त्याप्रमाणे आरोपी संतोष याला दौंड तर श्रीखंड्या याला केडगाव येथून अटक करण्यात आली. या आरोपींवर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई अखिलेश कुमार सिंह पोलीस अधीक्षक अहमदनगर, डॉ. सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक अ.नगर , संजय सातव उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, नेमणूक उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कर्जत विभाग व पोना संदीप पोपट पवार नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अ.नगर यांना माहिती मिळाल्यानंतर दिलीप पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अ.नगर यांचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोहवा दत्तात्रय हिंगडे, विजयकुमार वेठेकर, पोना / संदिप कचरु पवार, संदीप पोपट पवार, भागिनाथ पंचमुख, रवींद्र कर्डीले, पोकॉ विनोद मासाळकर , योगेश सातपुते , सुरज वाबळे , मेघराज कोल्हे , पोना दीपक शिंदे , रविकिरण सोनटक्के , चालक पोहवा / बाळासाहेब यांनी केलेली आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here