Beed : तलाठी भरती : …या वेबसाईटवर पाहा पात्र उमेदवारांची अंतरिम निवड व प्रतीक्षा यादी 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड – शासनामार्फत घेण्यात आलेल्या बीड जिल्हा आस्थापनेवरील तलाठी भरती-2019 मधील पदे भरण्याच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीअंती गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार यांची प्रवर्गनिहाय अंतरिम निवड व प्रतिक्षा यादी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ https://beed.gov.in यावर दिनांक 17 जून 2020 प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
सर्व उमेदवारांनी यावरील आपले आक्षेप लेखी स्वरुपात किंवा rdc.heed2@gmail.com या ई-मेल आयडीवर पुराव्यासह दिनांक 24 जून 2020 रोजी सायं.6.00 वा. पर्यंत सादर करावेत. त्यावरील निर्णयानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्धीस दिलेे आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here