प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

आंरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी या वर्षातील हे पहिले आणि सर्वात मोठे सूर्यग्रहण होत आहे. आकाशातील सावल्यांचा हा विलोभनीय खेळ पाहण्यासाठी अनेक खगोलप्रेमी सोलार चश्मे, किंवा काळ्या काचेतून अथवा अन्य उपकरण घेऊन तयार आहे. हे या वर्षातील कंकणाकृती सूर्यग्रहण असून रिंग ऑफ फायर पाहायला मिळणार आहे. मात्र महाराष्ट्रात फक्त खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयनांना यावेळीही रिंग ऑफ फायर टीव्ही व नेटवरील छायाचित्रांमध्येच पाहावे लागणार आहे.
या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे.
काय असते कंकणाकृती सूर्यग्रहण
जेव्हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो त्याची सावली सूर्यावर पडते तेव्हा सूर्यग्रहण होते संपूर्ण खग्रास सूर्यग्रहण क्वचितच दिसते. तर जेव्हा चंद्राची छाया 99 टक्के सूर्याला झाकून देते तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होते. या प्रकारात सूर्याचा संपूर्ण मधला भाग चंद्राच्या छायेने झाकला जातो. आणि केवळ कडेचा भाग प्रकाशमान असतो. त्यामुळे सूर्य अंगठी प्रमाणे दिसतो. त्यालाच रिंग ऑफ फायर असे म्हटले जाते.