सुशांत राजपूत आत्महत्या : करण, सलमान, संजय, एकता, साजिद यांच्यावर खटला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी बॉलीवूडच्या करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी, एकता कपूर साजिद नाडियादवाला यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील न्यायालयात हा खटला चालवला जाणार आहे. 

बॉलिवूडमधील नेपोटिझमवर या पूर्वीही करण जोहरला बॉलिवूड क्विन कंगना राणावतने सुनावले होते. त्यानंतर या वादाला चांगलेच तोंड फुटले. तरीही करण जोहर मात्र स्वतःचे समर्थन करीतच होता. तर सलमान खानच्या कारकिर्दीत आणखी एका खटल्याची वाढ झाली.

या पाचही जणांनी सुशांत सिंह राजपूतला बॉयकॉट करण्याचे ठरवले होते. व त्याच प्रकारे त्यांचे वर्तनही होते. याविरोधात अभिनेत्री कंगना, गायक सोनू निगम, ‘दबंग’चा दिग्दर्शक आणि अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यप यानेही या सर्व प्रकरणाविरोधात करण, सलमान यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले.

बिहारमध्ये तर सलमान खानच्या बिईंग ह्यूमन या चॅरिटेबल संस्थेविरोधातच आता वातावरण पेटले आहे. तसेच सलमान खानचे पोस्टरही जाळण्यात आले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here