Bollywood Khabar : बीईंग ह्यूमन चॅरिटी दिखावा; चॅरिटीच्या नावाखाली मनी लाँड्रिंग; अभिनव कश्यपचा आरोप

  0

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  बीईंग ह्यूमन चॅरिटी हा फक्त दिखावा असून या मार्फत मनी लाँड्रिंग करण्यात येते, असा गंभीर आरोप दबंगचा दिग्दर्शक अभिनव कश्यप याने केला आहे. तसेच सलमानच्या बीईंग ह्यूमनची चौकशी करण्याची मागणीही त्याने केली आहे.

  सुशांत सिंह राजपूत याच्या आत्म्हत्येनंतर सलमान आणि त्याच्या परिवाराला चांगलेच ट्रोल केले जात आहे. यात अभिनव कश्यपनेही सलमानच्या विरोधात आवाज उठवला आहे. सलमान बॉलिवूडमध्ये नेप्यूटिझम मोठ्या प्रमाणात करतो. तसेच जे लोक सलमानला आवडत नाही त्याला तो बॉलिवूडमध्ये टिकू देत नाही, असेही अभिनव याने सांगितले आहे.

  अभिनव म्हणतो दबंगच्या शुटींग दरम्यान सलमानने माझ्यासमोर केवळ 5 सायकली वाटल्या. मात्र, दुस-या दिवशी मीडियात 500 सायकली वाटल्याची बातमी आली. बिईंग ह्यूमन ही सलीम यांची फक्त आयडिया आहे. प्रत्यक्षात या माध्यमातून मनी लाँड्रिंग केली जात आहे, याची चौकशी व्हावी असे अभिनव कश्यप याने म्हटले आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here