Jafrabad : नगरपंचायत अंतर्गत पुलाच्या कामाचा शुभारंभ

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जाफराबाद – स्थानिक नगरपंचायत अंतर्गत धनगर समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक दिवसांपासून होणाऱ्या पुलाची मागणी लक्षात घेता आमदार दानवे यांच्या निधीतून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

नगराध्यक्ष पती तथा नगरसेवक दीपक वाकडे यांच्या अथक प्रयत्नातून आमदार संतोष पाटील दानवे यांच्या निधीमधून धनगर समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्याच्या दिवसात असलेल्या नालीमधून प्रेत यात्रेची हेळसांड होऊ नये. यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पुलाचे शुभारंभ मल्हार सेनेचे नेते धोंडू मामा दिवटे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाला सुरुवात केली.
त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे ,कौसर भाई नगरसेवक ,शेवाळे, विजय सोनवणे ,राजू जगताप ,श्याम वैद्य , खंबाटसर  रुस्तुम दिवटे , प्रदीप दिवटे, विनोद कोल्हे ,उकंडराव दिवटे, विजय वैद्य ,इंजिनीयर साळवेहे हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here