Kopargaon : तालुक्यात नगरसेवकासह १५ जण विलगीकरण कक्षात

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रतिनिधी| राष्ट्र सह्याद्री 

कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने उचल खाल्ली असून कोपरगाव शहरातील संजयनगर भागात एका नगरसेवकासह ६ जण तर करंजी ग्रामपंचायत हद्दीतील या रुग्णांच्या संपर्कात आलेले ९ जण अशा १६ जणांची श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयातील कोरोना विलगीकरण कक्षात रवानगी केल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.

देशभर अद्याप कोरोनाचा कहर सुरूच असून कोपरगाव तालुक्यात १० एप्रिल नंतर एका महिला डॉक्टरचा अपवाद वगळता एकही रुग्ण शिल्लक नव्हता मात्र दि.२० जून रोजी करंजी ग्रामपंचायत हद्दीतील मात्र येवला व वैजापूर आदी ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे शेतकरी हे कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते व त्यांच्या संपर्कात आलेला त्यांचा चांदवड येथे नोकरी करत असलेला मुलगा घरी आल्याने तो ही कोरोना बाधित असल्याचे नाशिक जिल्ह्याच्या यादीत निष्पन्न झाल्याने कोपरगाव तालुका प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यामुळे तालुका प्रशासनाने तातडीने करंजी गावात हजेरी लावून गावात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या असून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पैकी चार जण जास्त जोखमीचे असून पाच जण कमी जोखमीचे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.करंजी गावात प्रतोबंधीत क्षेत्र जाहीर केले आहे.व उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

दरम्यान कोपरगाव शहरातील संजयनगर उपनगर असलेल्या भागात औरंगाबाद येथील एका महिलेचा जावई व मुलगी भेटण्यासाठी आले होते त्या नंतर हि महिला कोरोनाचे लक्षण आढळले असून त्यांचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्याने शहर आरोग्य प्रशासनाने तातडीने संजयनगर,सुभाषनगर,वडार गल्ली,बाजार समिती मार्केट, मटण मार्केट परिसर,कृषिमित्र सोसायटी, परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.या परिसरातील नागरीकांना अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडण्यास प्रतिबंध केला असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here