Shevgaon : शेतक-याचा मुलगा झाला श्रेणी १ आधिकारी; महाराष्ट्र शासनाच्या उद्योग उपसंचालकपदी नियुक्ती

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव-शे येथील सागर उर्फ प्रमोद संभाजीराव लांडे यांची नुकतीच लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग उपसंचालक ( श्रेणी १ अधिकारी) पदी नियुक्ती झाली आहे. ढोरजळगांव सारख्या छोट्याशा गावातून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारा सागर हा शेतकरी कुंटुबांतील असून शेतक-यांच्या मुलाने दिवसरात्र मेहनत घेऊन श्रेणी १ अधिकारी होण्याचे वडिलांचे दिवास्वप्न पूर्णत्वास नेऊन तरूणपिढीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

 

सागर लांडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिजामाता विद्यालय भेंडा येथे झाले तर बीई मेकॅनिकल डिग्री त्यांनी अमृतवाहिनी इंजिनिरींग कॉलेज कोपरगांव येथे घेतली. यापूर्वी त्यांनी युपीएससी मार्फत पुरवठा निरीक्षक कर प्रशासक आधिकारीपदी आदी ठिकाणी वर्णी लागली असून सध्या ते संगमनेर येथील नगरपालिकेत पुरवठा निरीक्षक अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

यावेळी बोलताना सागर लांडे म्हणाले की  स्पर्धाच्या काळात जिद्द चिकाटी महत्वाचे भविष्याच्या दृष्टीने चिकाटी सातत्य व संयम यांच्या जोरावर ध्येय गाठू शकतो खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करून आपले मार्गक्रमण सुरू ठेवल्यास निश्चित आपले भविष्यातील वाटचालीला दिशा मिळू शकते. मला माझ्या स्पर्धा परीक्षा कालखंडात आमचे मोठे बंधू नगरपरिषदेचे मुख्यधिकारी रवींद्र लांडे व गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या यशाच्या प्रत्येक स्तरांवर बहुमोल मार्गदर्शन लाभले.

रवींद्र लांडे यांची महाराष्ट्र शासनाच्या उद्योग उपसंचालक (श्रेणी १ अधिकारी) पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा परीषद सदस्या हर्षदा काकडे व जनशक्ती मंचाचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे, ढोरजळगांव ग्रामपंचायत, वृध्देश्वर पंतसंस्था ढोरजळगांव त्रिमूर्ती शौक्षणिक संकुल ढोरजळगांव, श्रीराम मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या सागर लांडे यांच्या निवडीने सर्वच स्तरांतून त्यांचे अभिंनदन होत आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here