Kada : आता परिवहन महामंडळाची “लालपरी” करणार मालवाहतूक

3
शेतकरी, व्यापा-यांसाठी एसटीची ट्रान्स्पोर्ट क्षेत्रात एन्ट्री

प्रतिनिधी | राजेंद्र जैन | कडा

बहुजन हिताय, बहुजन सुखाय, हे ब्रीद घेऊन वर्षानुवर्षे प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करणारी परिवहन महामंडळाची लालपरी आता ट्रान्स्पोर्ट क्षेत्रात उतरली असून राज्यभरात कुठेही मालाची ने-आण करण्यासाठी अत्यंत माफक दरात एसटी मालाची सुरक्षित वाहतूक करणार असल्यामुळे लालपरी आता शेतकरी, व्यापारी वर्गाच्या दिमतीली धावणार आहे.

महाराष्ट्र शासनाकडून परिवहन महामंडळाच्या एसटीला खाजगी क्षेत्रात मालवाहतूक करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे महामंडळाची लालपरी शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या मदतीकरिता ट्रान्स्पोर्ट क्षेत्रात नव्याने मालवाहतूक करण्यासाठी उतरली आहे. त्यामुळे शेतमाल, औद्योगिक, कापड उद्योग, घरगुती साहित्य, किराणा, औषधे, खते,बी-बियाणे इत्यादीं मालाची संपूर्ण राज्यात कुठेही ने-आण करावयाची असेल तर एसटी खाजगी ट्रान्स्पोर्टपेक्षा अगदी किफायतशीर दरात वाहतूक सेवा उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे बहुजन हिताय, बहुजन सुखाय, हे ब्रीद घेऊन प्रवाशांना घेऊन रस्त्यावर सुरक्षित धावणा-या महामंडळाच्या एसटीने अत्यंत माफक दरात मालवाहतूक क्षेत्रात एन्ट्री केल्यामुळे शेतकरी, व्यापा-यांसाठी ही लालपरी आता लाभदायक ठरणार आहे.
खाजगी ट्रान्स्पोर्टच्या तुलनेत एसटी किफायतशीर ठरणार
शेतकरी, व्यापा-यांना जर माल हा एकेरी (म्हणजे फक्त माल पाठवायचा आहे) त्यासाठी 35 रुपये प्रति किमी खर्च येणार आहे. जर एखाद्याला आपला माल नगरला पाठवायचाय, आणि परत नगरवरुन काहीतरी माल आणायचा असेल तर त्यासाठी एसटीकडून सवलत देण्यात आली. समजा माल नेणे आणि आणने असेल तर जाताना 33 रुपये प्रति किमी खर्च येईल. परत त्याच ट्रकमध्ये माल परत आणायचा असेल तर 28 रुपये प्रति किमी खर्च येणार आहे. त्यामुळे खाजगी ट्रान्स्पोर्टच्या तुलनेत एसटी किफायतशीर ठरणार असल्याचे व्यापा-यांकडून सांगण्यात येत आहे.
व्यापा-यांचा फायदाच…
परिवहन मंडळाने अतिशय माफक दरात एसटीची मालवाहतूक सेवा उपलब्ध करुन दिल्यामुळे या सुविधेचा व्यापा-यांना खाजगी ट्रान्स्पोर्टपेक्षा फायदाच होणार आहे.
– संजय मेहेर, व्यापारी कडा

3 COMMENTS

  1. Thanks for another fantastic post. Where else could anybody get that kind of information in such an ideal approach of writing? I’ve a presentation next week, and I am at the search for such information.

  2. I was just looking for this information for some time. After 6 hours of continuous Googleing, at last I got it in your website. I wonder what is the lack of Google strategy that do not rank this kind of informative web sites in top of the list. Generally the top sites are full of garbage.

  3. I’m truly enjoying the design and layout of your blog. It’s a very easy on the eyes which makes it much more pleasant for me to come here and visit more often. Did you hire out a developer to create your theme? Excellent work!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here